सध्या बेरोजगारी वाढत आहे, त्यामुळे तरुण सरकारी खात्यात नोकरीशोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा तरुणांसाठी थेट रेल्वेमध्ये सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. पश्चिम रेल्वेने आता स्टेशन मास्तर, स्टेशन कमर्शियल कम तिकीट आणि सीनियर क्लर्क कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टाईपराईटर, जूनियर क्लर्क कम टाइपिस्ट अशा विविध पदांसाठी इच्छूकांकडून अर्ज मागवले आहेत. एनटीपीसी पदवीधर पदांसाठी एकूण 55 आणि एनटीपीसी 12 वी उत्तीर्ण पदांसाठी 66 जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी शुक्रवारी, ८ जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2022 आहे.
शिक्षण पात्रता
- स्टेशन मास्तर, सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क आणि सीनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदांसाठी पदवीधर असण्याची अट
- दुसरीकडे, कमर्शियल कम तिकीट लिपिक, लेखा लिपिक सह टाईपिस्ट आणि कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक या पदांसाठी 12 वी पास असण्याची अट
(हेही वाचा कोकणवासीयांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी दररोज धावणार विशेष गाडी…)
वयोमर्यादा
अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 वर्षांवरून 42 वर्षे, ओबीसी उमेदवारांसाठी 45 वर्षे आणि एससी एसटी उमेदवारांसाठी 47 वर्षे ठेवण्यात आली आहे.
वेतन
- स्टेशन मास्तर – दरमहा 35 हजार 400 रुपये
- वरिष्ठ व्यावसायिक कम तिकीट लिपिक – 29 हजार 200 रुपये
- वरिष्ठ लिपिक कम टायपिस्ट – 29 हजार 200 रुपये
- व्यावसायिक कम तिकीट लिपिक – 21 हजार700 रुपये
- लेखा लिपिक सह टाईपिस्ट – 19 हजार 900 रुपये
- कनिष्ठ लिपिक सह टाईपिस्ट – 19 हजार 900 रुपये