पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात मोठा बदल; मुंबईकरांचा प्रवास होणार आरामदायी, एकूण फेऱ्यांची संख्या १३८३

94

मुंबई लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात सणासुदीच्या दिवसात पश्चिम रेल्वेने प्रवाशांना खुशखबर दिली आहे. प्रवासाच्या वेळेत बचत व्हावी यासाठी १५ आणि १२ डब्यांच्या एकूण ५० फेऱ्यांचा विस्तार करण्यात येणार असून या मार्गावर ३१ एसी लोकल फेऱ्या होणार आहेत. पश्चिम रेल्वेवर १ ऑक्टोबरपासून नवे वेळापत्रक लागू होणार झाल्यावर या फेऱ्या उपलब्ध होतील.

( हेही वाचा : SBI अ‍ॅपद्वारे करा स्वस्तात रेल्वे तिकिटांची बुकिंग! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया)

१ ऑक्टोबरपासून वेळापत्रकात बदल 

या मार्गावर ३१ एसी लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. यामुळे चर्चगेट ते विरार दरम्यान लोकलच्या ३७ एसी फेऱ्या आणि चर्चगेट ते बोरीवली दरम्यान लोकलच्या १८ एसी फेऱ्या होतील. १५ डबा गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत होती. आता प्रवाशांच्या मागणीनुसार १५ डब्यांच्या २७ गाड्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ७९ फेऱ्या असून नवे वेळापत्रक लागू झाल्यानंतर संख्या १०९ वर पोहोचणार आहे. सुट्टीच्या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा यामुळे फायदा होणार आहे असे पश्चिम रेल्वेने सांगितले आहे.

शनिवारपासून हे नवे वेळापत्रक लागू झाल्यावर पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण लोकल फेऱ्या १३७५ वरून १३८३ होणार आहेत. अंधेरी ते विरार दरम्यान १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या चालवण्यासाठी आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.