पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या ओव्हरहेड वायर तुटल्याने अर्धा तास उशिराने धावत आहेत. एसी लोकलची ओव्हरहेड वायर तुटल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
( हेही वाचा : भठिंडा मिलिट्री कॅम्पमध्ये गोळीबार! चार जवानांचा मृत्यू, सर्च ऑपरेशन सुरू)
प्रवाशांचे हाल
या तांत्रिक बिघाडामुळे ऐन गर्दीच्या वेळी बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. अनेकांनी लोकलमधून खाली उतरून पुढचा प्रवास करण्यास पसंती दिली आहे. सध्या ही वायर जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विरारवरून येणाऱ्या सर्व गाड्या यामुळे रखडल्या असून यासंदर्भात पश्चिम रेल्वेने सुद्धा माहिती दिली आहे.
रेल्वे गाड्या रखडल्या, वेळापत्रक कोलमडले
ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे सध्या ३ लोकल चर्चगेट आणि दहिसर दरम्यान अडकल्या आहेत यामध्ये एका एसी लोकलचा सुद्धा समावेश असल्याची माहिची पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. आता दोन्ही मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर डायव्हर्ट केल्या जात असल्याने पश्चिम रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले आहे तसेच सकाळी चाकरमान्यांच्या कामावर जाण्याच्या वेळेस हा बिघाड झाल्याने अनेकांनी रेल्वेतून उतरून पुढील प्रवास सुरू केला यामुळे एक्स्प्रेस वे वर सुद्धा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
Join Our WhatsApp Community