मुंबईकरांची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दरम्यान जानेवारी महिन्याच्या 24, 25 आणि 26 रात्री हा ‘जम्बो मेगा ब्लॉक’ (western railway ‘Jumbo Mega Block) घेण्यात येणार आहे. या काळात पश्चिम रेल्वेच्या ३३० पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. (Western Railway Update)
पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरील माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पश्चिम रेल्वेने मेगा ब्लॉक घेत असल्याचे सांगितले आहे. या ब्लॉकमुळे, शुक्रवार/शनिवारच्या रात्री 127 उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील आणि शनिवार/रविवारच्या रात्री सुमारे 150 उपनगरीय लोकल सेवा रद्द (Local trains cancelled) केल्या जातील. याव्यतिरिक्त, सुमारे 60 उपनगरीय सेवा रद्द केल्या जाणार आहे.
(हेही वाचा – Dinesh Waghmare यांची महाराष्ट्राचे नवे राज्य निवडणूक आयुक्त)
24 जानेवारी (शुक्रवारी) रात्री 11 ते शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक राबविला जाईल. या काळात डाऊन फास्ट मार्गावर देखील रात्री 12.30 ते सकाळी 6.30 वाजेपर्यंत ब्लॉक राहील. तसेच 25 आणि 26 जानेवारीला रात्री 11 ते रविवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत अप आणि डाऊन स्लो आणि डाऊन फास्ट मार्गांवर ब्लॉक सुरू होईल. जलद मार्गावर शनिवारी रात्री 11 वाजता ब्लॉक सुरू होऊन रविवारी सकाळी 7.30 वाजेपर्यंत ब्लॉक राहील. 24 जानेवारीला शेवटची चर्चगेट-विरार स्लो लोकल (Churchgate-Virar Slow Local) रात्री 11.58 वाजता सुटेल. रात्री 11 वाजेपासून चर्चगेटवरून सुटणाऱ्या सर्व स्लो लोकल मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ दरम्यान जलद मार्गावर धावतील. यावेळी महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकांवर लोकल (Local Railway) थांबणार नाही.
चर्चगेटवरून पहिली डाउन फास्ट लोकल सकाळी 6.14 वाजता सुटणार-
24 जानेवारीला रात्री 11 वाजेनंतर विरार, भाईंदर आणि बोरिवलीहून सुटणाऱ्या स्लो गाड्या सांताक्रूझ आणि मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर धावतील. याव्यतिरिक्त, काही पश्चिम रेल्वे लोकल हार्बर मार्गावर गोरेगाव आणि वांद्रे दरम्यान धावतील. 25 जानेवारी (शनिवारी) सकाळी विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर आणि बोरिवली येथून येणाऱ्या स्लो आणि फास्ट लोकल अंधेरी येथे थांबतील. ब्लॉकनंतर चर्चगेटकडे जाणारी पहिली फास्ट लोकल शनिवारी सकाळी 5.47 वाजता विरारहून सुटेल आणि चर्चगेटला सकाळी 7.05 वाजता पोहोचेल. चर्चगेटवरून पहिली डाउन फास्ट लोकल सकाळी 6.14 वाजता सुटेल आणि चर्चगेटवरून पहिली डाउन स्लो लोकल ब्लॉकनंतर सकाळी 8.03 वाजता सुटेल. याशिवाय, या ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होईल.
पुढील लांब पल्ल्याच्या गाड्यां रद्द-
12267 मुंबई सेंट्रल-हापा दुरंतो एक्सप्रेस (25 जानेवारी 2025)
12268 हापा-मुंबई सेंट्रल दुरंतो एक्सप्रेस (26 जानेवारी 2025)
12227 मुंबई सेंट्रल-इंदूर दुरंतो एक्सप्रेस (25 जानेवारी 2025)
12228 इंदूर-मुंबई सेंट्रल दुरंतो एक्सप्रेस (26 जानेवारी 2025)
(हेही वाचा – पूर रोखण्यासाठी नद्यांमधील गाळ काढण्याला प्राधान्य द्या; Nitesh Rane यांचे निर्देश)
पुढील गाड्या बोरिवलीहून सुटणार-
09052 भुसावळ-दादर स्पेशल (25 जानेवारी 2025)- बोरिवली येथे प्रवास समाप्त होईल.
12927 दादर-एक्ता नगर सुपरफास्ट एक्सप्रेस (25 जानेवारी 2025)- बोरीवलीहून सुटेल.
19003 दादर-भुसावळ खानदेश एक्स्प्रेस (26 जानेवारी 2025)- बोरीवलीहून सुटेल.
19015 दादर-पोरबंदार सौराष्ट्र एक्स्प्रेस (26 जानेवारी 2025)- बोरीवलीहून सुटेल.
22946 ओखा-मुंबई सेंट्रल सौराष्ट्र मेल (25 जानेवारी 2025)- बोरीवली येथे प्रवास समाप्त होईल.
12902 अहमदाबाद-दादर गुजरात मेल (25 जानेवारी 2025)- पालघर येथे प्रवास समाप्त होईल.
59024 वलसाड-मुंबई सेंट्रल पॅसेंजर (26 जानेवारी 2025)- बोरीवली येथे प्रवास समाप्त होईल.
59045 मुंबई सेंट्रल-वापी पॅसेंजर (26 जानेवारी 2025) – बोरिवली येथून प्रवास सुरू होईल.
12904 अमृतसर-मुंबई सेंट्रल गोल्डन टेम्पल मेल (24 जानेवारी 2025)- अंधेरी येथे प्रवास समाप्त होईल.
19016 पोरबंदर-दादर सौराष्ट्र एक्सप्रेस (24 जानेवारी 2025)- बोरीवली येथे प्रवास समाप्त होईल.
हेही पाहा-
Join Our WhatsApp Community