अनधिकृत प्रवाशांना (Unauthorized passengers) आळा घालण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, पश्चिम रेल्वेने २३ आणि २९ ऑगस्ट २०२४ रोजी वातानुकूलित (AC) लोकल ट्रेन (AC local trains) सेवेमध्ये दोन दिवसीय विशेष तिकीट तपासणी मोहीम आयोजित केली होती. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे अवैध तिकिटांशिवाय प्रवास करणाऱ्या १,२७३ प्रवाशांचा शोध घेण्यात आला असून त्यांच्याकडून चार लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (Western Railway)
(हेही वाचा – Haryana Assembly Elections : हरियाणात काँग्रेस झाला बाप-लेकाचा पक्ष; किरण चौधरींची प्रखर शब्दात टीका )
पश्चिम रेल्वेने केलेल्या विशेष चेकिंग ऑपरेशनबद्दल
विशेष तपासणी मोहीम ही सकाळ आणि संध्याकाळच्या दरम्यान आयोजित केली गेली होती. यात गर्दीचा फायदा घेत अवैध तिकिटांशिवाय प्रवास करणाऱ्या ५९५ प्रवाशांकडून मोहिमेच्या पहिल्याच दिवशी दंड वसूल करण्यात आला, तर दुसऱ्या दिवशी ६७८ प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. (Western Railway)
(हेही वाचा – Haryana Assembly Elections : हरियाणात काँग्रेस झाला बाप-लेकाचा पक्ष; किरण चौधरींची प्रखर शब्दात टीका)
सध्या, पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) मुंबई सेंट्रल विभागात ७९ एसी लोकल ट्रेनची सेवा दिली आहे, यामध्ये दररोज १.५ लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा पुरवली जाते. सर्व नियमाचं पालन करून तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी त्रासमुक्त आणि आरामदायी प्रवास व्हावा. असा यामागचा उद्देश आहे. (Western Railway)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community