मेट्रोने प्रवास करताय कायदे समजून घ्या, नुसते थुंकलात तरी…

117

मुंबईत मेट्रोचे जाळे सर्वत्र पसरत चालले आहे. एकेकाळी मुंबईत लोकल ट्रेन बंद पडली तर मुंबई ठप्प व्हायची, आता मुंबईतील सार्नजनिक परिवहन व्यवस्थेला मेट्रो पर्याय निर्माण केला आहे. त्यामुळे लोकल बंद झाली, तरी मुंबईकरांची गैरसोय होणार नाही. कारण दक्षिण, मध्य, पश्चिम मुंबईला मेट्रोने जोडण्यात आले आहे. मात्र लोकलने वाईट सवयी जोपासत प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मेट्रोमधून प्रवास करताना वाईट सवयींना आळा घालून प्रवास करावा लागत आहे. अन्यथा पान, सुपारी खाऊन थुंकण्यानेही मुंबईकरांचा खिसा रिकामा होऊ शकतो. नुसते थुंकणे सोडाच, सह प्रवाशासोबत मारामारी करून त्याला दुखापत केली तर थेट जन्मठेप किंवा 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल.

काय आहे मेट्रोची नियमावली? 

  • मद्यप्राशन करणे आणि इतरांना त्रास देणे – ५०० रुपये दंड
  • मेट्रोमधील डब्यात अथवा स्थानक परिसरात थुंकणे – ५०० रुपये दंड
  • गुन्हेगारी सदृश्य वस्तूंसह मेट्रोतून प्रवास करणे – ५०० रुपये दंड आणि ४ वर्षांचा कारावास किंवा दोन्ही
  • मेट्रोतून घातक वस्तू घेऊन प्रवास करणे – ५०० रुपये दंड
  • मेट्रो परिसरात आंदोलन करणे – १,००० रुपये दंड अथवा ६ महिन्यांचा कारावास
  • बेकायदा मेट्रोमध्ये प्रवेश करणे – २५० रुपयांचा दंड किंवा ३ महिन्यांचा कारावास अथवा दोन्ही
  • मेट्रोच्या ट्रॅकवरून चालणे – ५०० रुपयांचा दंड किंवा ६ महिन्यांचा दंड अथवा दोन्ही
  • ट्रेन चालवण्यास अडथळा निर्माण करणे – ५ हजारांचा दंड किंवा ४ वर्षांचा कारावास किंवा दोन्ही
  • मेट्रोच्या कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे – १ हजार रुपयांचा दंड किंवा १ वर्षांचा कारावास किंवा दोन्ही
  • तिकिटाच्या भाड्यात योग्य स्थानकाच्या पुढे प्रवास करणे – ५० रुपयांचा दंड आणि तिकिटाचे भाडे
  • ट्रेनमधील दळणवळणाच्या साधनांमध्ये अनावश्यकपणे हस्तक्षेप करणे – १ हजार रुपयांचा दंड किंवा १ वर्षांचा कारावास किंवा दोन्ही
  • पास किंवा तिकीट बदलणे किंवा खराब करणे किंवा बनावट करणे – ६ महिन्यांपेक्षा जास्त कारावास
  • मेट्रो रेल्वेवरील वस्तूंची अनधिकृत विक्री – ५०० रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास ६ महिन्यांपर्यंत कारावास
  • दुर्भावनापूर्णपणे ट्रेनची नासधूस करणे किंवा तोडफोड करणे – जन्मठेप किंवा १० वर्षांपर्यंत सश्रम कारावास किंवा मृत्यूदंडाची शिक्षा
  • मेट्रो रेल्वेने प्रवास करणार्‍या सह प्रवाशाला दुर्भावनापूर्णपणे दुखापत करणे किंवा दुखावण्याचा प्रयत्न करणे – जन्मठेप किंवा १० वर्षांपर्यंतच्या कारावास, गुन्ह्याच्या स्वरूपानुसार शिक्षा
  • मेट्रो रेल्वेच्या ठराविक मालमत्तेचे नुकसान करणे – १० वर्षांपर्यंत कारावास
  • जाणूनबुजून किंवा चुकून मेट्रो रेल्वेने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची सुरक्षा धोक्यात आणणे – ७ वर्षांपर्यंत कारावास

(हेही वाचा देवेन भारती यांच्यासह ४ पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’! देशातील ९०१ पोलिसांचा सन्मान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.