कोरोना चाचण्यांसाठी काय आहे नवी नियमावली?

कोरोना चाचण्यासंबंधी सध्या रुग्णालय आणि प्रयोगशाळांकडून हलगर्जीपणा होत असल्याने गोंधळ होत आहे, त्यामुळे महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली.  

83

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता आरोग्य सेवांसाठी नवी नियमावली बनवली आहे. कोरोना चाचण्यासंबंधी रुग्णालय आणि प्रयोगशाळांकडून हलगर्जीपणा होत आहे, त्यामुळे महापालिकेने हा तात्काळ निर्णय घेतला आहे.

रुग्णालयांसाठी ही आहे नियमावली! 

  • रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची ICMRच्या निकषानुसार रॅपिड अँटीजेन टेस्ट करावी.
  • त्याचा अहवाल ICMR च्या पोर्टलवर २४ तासांत अपलोड करावा, जरी तो अहवाल निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह आला तरी.
  • तसेच तो अहवाल महापालिकेलाही पाठवावा रुग्णालयात आजारी आहे म्हणून एखादा रुग्ण दाखल होण्यास आला तर आधी त्याची  रॅपिड अँटीजेन टेस्ट करावी.
  • जर खाट उपलब्ध असेल आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर वैद्यकीय सल्ल्यानुसार त्याला दाखल करून घ्यावे आणि डॅशबोर्डवर तशी नोंद करावी.
  • जर खाट उपलब्ध नसेल तर रुग्णाला घरीच विलगीकरण होण्याचा सल्ला द्यावा.
  • ICMR ला कळवावे त्यांची यादी महापालिकेच्या साथरोग पथकाला द्यावी.
  • महापालिकेच्या परवानगीशिवाय कोणत्याही रुग्णालयाने रॅपिड अँटीजेन टेस्ट करू नये.

(हेही वाचा : क्वारंटाईन केलेल्या विदेशी प्रवाशांवर तपासणी पथकाचा वॉच!)

प्रयोगशाळेसाठी नियमावली 

प्रयोगशाळेला कोणत्याही रुग्णाचा अहवाल २४ तासाच्या आत देऊ नये, असा नियम असतानाही काही प्रयोगशाळा अहवाल थेट रुग्णाला कळवतात. महापालिकेला पाठवत नाही. त्यामुळे संबंधित प्रयोगशाळेने आधी तो ICMRच्या पोर्टलवर अपलोड करावा,  त्यानंतर तो रुग्णाला द्यावा, घरी जाऊन नमुने घेणाऱ्या प्रयोगशाळेने आधी रुग्णाला फोन वरून त्याची लक्षणे समजून घ्यावीत. .

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.