NEET मध्ये फसवणूक करणारा डॉक्टर झाला, तर काय होईल; Supreme Court ने फटकारले

जर काही चूक झाली असेल, तर होय ही एक चूक आहे आणि आम्ही ही कारवाई करणार आहोत, असा दिलासा द्यायला हवा होता, असे Supreme Court ने म्हटले आहे.

167
NEET Exam: ज्या विद्यार्थ्यांना लाभ मिळाला त्यांची माहिती 10 जुलैपर्यंत द्यावी, 11 जुलैला सुनावणी; Supreme Court म्हणाले...
NEET Exam: ज्या विद्यार्थ्यांना लाभ मिळाला त्यांची माहिती 10 जुलैपर्यंत द्यावी, 11 जुलैला सुनावणी; Supreme Court म्हणाले...

कल्पना करा की, ज्या व्यक्तीने यंत्रणेची फसवणूक केली आहे आणि तो डॉक्टर होतो. ते समाजासाठी अधिक हानीकारक आहे. परीक्षा आयोजित करण्यासाठी जबाबदार असलेल्या संस्थांचे प्रतिनिधित्व करतांना, तुम्ही खंबीरपणे उभे रहाणे आवश्यक आहे. जर काही चूक झाली असेल, तर होय ही एक चूक आहे आणि आम्ही ही कारवाई करणार आहोत, असा दिलासा द्यायला हवा होता. कमीत कमी त्यामुळे तुमच्या कामगिरीवरील विश्वास वृद्धिंगत झाला असता, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय चाचणी संस्थेला (एनटीए) फटकारले आहे. ५ मे रोजी झालेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या वाढीव गुणांसह तक्रारी मांडणाऱ्या दोन स्वतंत्र याचिकांवर खंडपीठात सुनावणी सुरू होती.

(हेही वाचा – Maharashtra BJP नेतृत्वात कोणताही बदल नाही; दिल्लीतील बैठकीत निर्णय)

या वेळी न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि एस.व्ही.एन.भाटी यांच्या सुटीतील खंडपिठाने केंद्र आणि राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) यांच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलांना सांगितले की, कोणाच्याही बाजूने ०.००१ टक्के निष्काळजीपणा असला तरीही, त्यावर सखोल कारवाई केली पाहिजे.”

खटल्याला विरोधी मानले जाऊ नये

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सांगितले की, नीट-यूजी २०२४ च्या परीक्षेत कोणाकडूनही ‘०.००१ टक्के निष्काळजीपणा झाला असला तरी, तरी ठोस करवाई व्हायला हवी. या परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतात. राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेशी (पदवी)-२०२४ (NATIONAL ELIGIBILITY CUM ENTRANCE TEST) संबंधित खटल्याला विरोधी मानले जाऊ नये.

दरम्यान, नीट गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करा. परीक्षेतील घोटाळेबाजांवर कारवाई करा, या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरत असून मंगळवारी छत्रपती संभाजीनगर आणि चंद्रपूरमध्ये विद्यार्थ्यांनी मोर्चे काढून सरकारचा निषेध केला. वसमतमधील विद्यानगर भागात दीपिका दौलत खंदारे (१७, रा. आहेरवाडी, ता. पूर्णा, जि. परभणी) या विद्यार्थिनीने नीट परीक्षेच्या तणावातून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनाही नुकतीच घडली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.