शेतीच्या सिंचनासाठी सौरऊर्जेवर चालणारे एक लाख सौर पंप बसवण्यात येणार आहेत. हे सौरपंप शेतकऱ्यांना अनुदानित दरामध्ये मिळतील. सौर पंपाचा वापर दिवसा शेतीचं सिंचन करण्यासाठी करता येतो. याव्यतिरिक्त सौर पंप बसविण्यासोबतच शेतकऱ्यांना २ डीसी एलईडी, १ पंखा आणि मोबाईल चार्ज करण्यासाठी सॉकेट मिळणार आहे.
योजनेचा सारांश
- योजनेचं नाव – मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana).
- लाँच वर्ष – २०१९.
- फायदा – सवलतीच्या दरात सौरपंप उपलब्ध.
- लाभार्थी – महाराष्ट्रातील शेतकरी.
- नोडल विभाग – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड.
- सदस्यत्व – या योजनेची अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन सदस्यता घ्या.
- अर्ज करण्याची पद्धत – एमएसईडीसीएल सोलर पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
(हेही वाचा – Lilavati Hospital : लीलावती रुग्णालय ट्रस्ट मध्ये १२ हजार कोटींचा गैरव्यवहार, १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल)
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा संक्षिप्त परिचय
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये सौर पंप उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने २०१९ साली “सौर कृषी पंप योजना”(Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana) सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाच्या गरजा पूर्ण करणे हा या योजनेमागचा मुख्य हेतू आहे.
डिझेलच्या पंपांच्या जागी सौर कृषी पंप योजनेंतर्गत बसवलेल्या सौर पंपांमुळे प्रदूषण कमी करण्यासाठी नक्कीच मदत होईल. या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासन या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना १,००,००० सौरपंप उपलब्ध करून देणार आहे.
सौरऊर्जेवर चालणाऱ्या या पंपांचा वापर शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आणि खिशाला परवडणारा ठरेल. त्यामुळे शेतकऱ्यांवरचा आर्थिक भार बराच कमी होईल. कारण डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपांचा ऑपरेटिंग खर्च जास्त आहे, म्हणून सौर ऊर्जेवर चालणारा हा पंप शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर असेल. हा सौर पंप शेतामध्ये बसवण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या ९० ते ९५ टक्के खर्च महाराष्ट्र शासन करेल.
(हेही वाचा – Chembur आणि घाटकोपर पंतनगरमधील कचरा वर्गीकरण केंद्र कसे चालले? अतिरिक्त आयुक्त डॉ. जोशी यांनी केली केंद्रांची पाहणी)
या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसाही आपल्या शेतीला पाणी देता येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana) ही स्वच्छ आणि हरित पर्यावरणाच्या दिशेने उचललेलं एक मोठं पाऊल आहे. कारण यामुळे प्रदूषण कमी होतं.
सौर कृषी पंप योजनेंतर्गत लावले जाणारे सौर पंप हे ३ HP, ५ HP आणि ७.५ HP चे असतील. महाराष्ट्र शासनातर्फे (Government of Maharashtra) हे सौर पंप सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जातील. हे पंप स्थापित केल्या जाणाऱ्या मोटरची पावर आणि शेतकऱ्यांच्या श्रेणीनुसार बदलू शकतात.
शेतकऱ्यांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष काळजीपूर्वक वाचले पाहिजेत; कारण प्रत्येक पंपाचे वेगवेगळे निकष शेतकऱ्यांना पूर्ण करावे लागतात. सौर पंप मिळवण्यासाठी पात्र असलेले शेतकरी आपले सौर कृषी पंप योजनेचे अर्ज MSEDCL सौर पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने सबमिट करू शकतात. सौर कृषी पंप योजनेचा (Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana) अर्ज सादर करताना अर्जदार शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवायला हवीत. मग अर्ज सादर केल्यानंतर १० दिवसांच्या आत प्राधिकरण सर्वेक्षण करेल आणि मागणी पत्र जारी करेल. पुढे सबमिट केलेल्या फॉर्ममध्ये काही विसंगती आढळल्यास, त्यानुसार प्राधिकरणास सूचित केलं जाईल.
सौर कृषी पंप योजनेचे फायदे
सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना खालील फायदे मिळतील
- पुढील तीन वर्षांमध्ये एक लाख ऑफ ग्रीड सौर उर्जेवर चालणारे कृषी पंप पुढील पद्धतीने बसवले जातील:-
- पहिल्या वर्षी – ₹२५,०००.
- दुसऱ्या वर्षी – ₹५०,०००.
- तिसऱ्या वर्षी – ₹२५,०००.
- सोलार पंप बसवल्यानंतर शेतकऱ्यांना २ डीसी एलईडी, १ पंखा आणि मोबाईल चार्जिंगसाठी सॉकेटची अतिरिक्त तरतूद करून दिली जाईल.
- सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध असेल.
- दुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल.
(हेही वाचा – Chicken Biryani खाताना घशात अडकले कोंबडीचे हाड; उपचारासाठी मोजावे लागले ४ लाख)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?
- शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- शेतकऱ्यांकडे पाण्याचा खात्रीशीर स्त्रोत असलेली शेतजमीन असावी.
- शेतकऱ्यांना पंपासाठी पारंपरिक वीज जोडणी मिळालेली नसावी.
- शेतकऱ्यांना यापूर्वी कोणत्याही योजनेअंतर्गत विजेचा लाभ मिळालेला नसावा.
- नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केलेले शेतकरी या योजनेंतर्गत पात्र असतील.
- “धडक सिंचन योजनेचे” लाभार्थी असलेले शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र असतील.
- ५ एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी ३ एचपी पंप उपलब्ध आहेत. ५ एकरपेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना ५ एचपी आणि ७.५ एचपी पंप उपलब्ध आहेत.
- पंपातून पाण्याचा स्त्रोत विहीर किंवा कूपनलिका असावी.
- पंपांसाठी पाण्याच्या स्त्रोताची खोली ६० मीटरपेक्षा जास्त नसावी.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे
- पत्त्याचा पुरावा.
- आधार कार्ड.
- जात प्रमाणपत्र (SC/ST लाभार्थ्यांसाठी).
- ७/१२ उतारा प्रत.
सौर कृषी पंप योजनेसाठी (Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana) अर्ज ऑनलाइन सादर केले जाऊ शकतात. सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाइन अर्जाचे फॉर्म महावितरणाच्या सोलर पोर्टलच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community