इन्कम टॅक्स, जीएसटी यांसारख्या अनेक करांविषयी आपल्याला माहिती आहे. परंतु आजही बहुतेक लोकांना पिंक टॅक्स या संकल्पनेविषयी माहिती नसेल. पिंक टॅक्स म्हणजे काय पाहूयात…
( हेही वाचा : Travel Now Pay Later : रेल्वे प्रवाशांना मिळणार उधारीवर तिकीट; आधी प्रवास करा, मग तिकिटाचे पैसे भरा!)
पिंक टॅक्स म्हणजे काय ?
महिलांना आपल्या पर्सनल केअर वस्तू किंवा सेवांसाठी कराचे जास्तीचे पैसे मोजावे लागतात. बहुतेकांना आजही या पिंक टॅक्सविषयी माहिती नाही. याचा सर्वाधिक फटका महिलांना बसतो. पिंक टॅक्स हा अधिकृत टॅक्स नाही. हा कर स्त्रियांच्या वस्तू आणि सेवांसाठी आकारला जातो. याद्वारे महिला उत्पादनांवर ७ टक्के, महिलांच्या कपड्यांवर ८ टक्के कर आकारला जातो, तर पर्सनल केअरच्या वस्तूंवर १३ टक्के कर आकारण्यात येतो.
पिंक टॅक्स हा अप्रत्यक्ष कर आहे, यामुळे महिलांचा परफ्यूम, पेन, बॅग आणि कपड्यांवर कंपन्या उत्पादनांच्या किमतीपेक्षा जास्त पैसे आकारतात. उदाहरणार्थ महिलांच्या पर्सनल केअर वस्तू या पुरूषांच्या वस्तूंपेक्षा महाग आहेत. केस कापण्यासाठी सुद्धा महिलांना पुरूषांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. अनेक विदेशातील देशांमध्ये या अप्रत्यक्ष कराला पिंक टॅक्स असे म्हणतात.
कंपन्यांची मार्केटिंग स्टॅट्रेजी
समान वस्तू आणि सेवांसाठी महिलांना जास्त पैसे मोजावे लागतात. पिंक टॅक्स ही अदृश्य किंमत आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला अनेक प्रकारची पर्सनल केअर उत्पादने वापरतात. महिलांच्या गरजा लक्षात घेऊन बहुराष्ट्रीय कंपन्या जादा शुल्क आकारतात. महिला आपल्या सौंदर्याची काळजी घेतात हे कंपन्यांना माहिती असते याचा फायदा घेत उत्पादनांच्या किमती वाढवल्या जातात. ही आता कंपन्यांची मार्केटिंग स्टॅट्रेजी बनली आहे. यालाच अनेक देशांमध्ये पिंक टॅक्स असेही संबोधले जाते.
Join Our WhatsApp Community