सर्व पक्षांमध्ये मोठ्या आकाराचा पक्षी म्हणून शहामृगाची ओळख आहे. हा पक्षी वाळवंटी प्रदेशात आढळतो. जवळजवळ ४० ते ४५ वर्षे हा पक्षी जगू शकतो आणि ताशी ६५ किमीपर्यंत वेगाने धावू शकतो. महत्वाचे म्हणजे एका पायात १० ते १५ फूट अंतर तो सहज कापू शकतो. त्यामुळे तो गाड्यांनाही मागे टाकू शकतो. परंतु हा पक्षी उडू शकत नाही.
या अद्भूत पक्ष्याबद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा पक्षी दगड खातो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं काय शक्य आहे. परंतु त्याच्या इतर अन्न पदार्थांसह तो दगडही खातो हे सत्य आहे. शहामृगाचं अन्न म्हणजे लहान रोपं, झाडांची मूळं, पाज, बिया, कीटक इ. शहामृग हा असा पक्षी आहे, जो काही दिवस उपाशी राहू शकतो, अगदी पाणी न पिताही तो जगू शकतो.
(हेही वाचा भाजपलाही भीक घालत नाही महापालिका प्रशासक; ‘त्या’ पत्रालाही दाखवली केराची टोपली)
दीर्घायुषी असलेल्या या पक्ष्याची मोठ्या प्रमाणात शिकार होत होती. हा पक्षी उडू शकत नाही, त्याचबरोबर त्याचे मांस देखील चविष्ट असते असं म्हणतात. यामुळे जगभरात शहामृगाची मोठ्या प्रमाणात शिकार झाली. तरी सुद्धा हा पक्षी अजूनही टिकून आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या पक्षाची वाढ देखील खूप लवकर आणि झपाट्याने होते.
सहा महिन्यांच्या आत हा पक्षी व्यवस्थित उंच आणि धष्टपुष्ट दिसतो. ४ वर्षांत तर पूर्ण विकास झालेला असतो. जर चांगलं खाद्य मिळालं तर हा पक्षी किमान ७० वर्षे तरी जगतो. आता मूळ मुद्दा असा की दगड खाण्याचं काय कारण? तर यामागे गंमतीदार कारण आहे. शहामृगाला दात नसतात म्हणून तो आपलं अन्न गिळून टाकतो. त्यामुळे अन्न पचन होत नाही. अन्न पचावं म्हणून तो लहान दगड खातो. या दगडांच्या मदतीने तो आपलं अन्न पचवतो. कारण जरी विचित्र वाटलं तरी हे अगदी खरं आहे.
Join Our WhatsApp Community