रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजारच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हापासूनच आता मोदी सरकारने पुन्हा नोटबंदी केली आहे का? असा प्रश्न सगळीकडे निर्माण झाला आहे. तर याचे उत्तर आहे, नाही. असे काहीही झालेले नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी भारताच्या चलनासंबंधी योग्य ते निर्णय घेत असते. दोन हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय त्यापैकीच एक आहे. रिझर्व्ह बँकेच्या क्लीन नोट पॉलिसीनुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आरबीआयचे म्हणणे आहे की दोन हजारांच्या बहुतांश नोटा आता वापरण्यासाठी योग्य राहिलेल्या नाहीत. म्हणून आता त्यांचे चलन बंद करण्यात यावे असा निर्णय घेतला आहे. तरीही पुढे काही महिने या नोटांनी सामान्य देवाणघेवाण केली जाऊ शकते. त्याबद्दल या लेखामध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया.
दोन हजारच्या नोटा या 30 सप्टेंबरपर्यंत वैध असतील. तुमच्याकडे असलेल्या नोटा तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यात जमा करू शकता किंवा बँकेकडून तुम्ही 2000 च्या नोटा देऊन इतर नोटांच्या चलनातली ठराविक रक्कमेच्या नोटा बदली करून घेऊ शकता. 23 मे पासून तुम्ही बँकेमध्ये एका दिवसात 20,000 एवढ्या रकमेच्या नोटा बदली करून घेऊ शकता.
(हेही वाचा BMC : महापालिकेच्या शाळांचा आता गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पुढाकार)
बँकेत नोटा जमा करताना तुमची केवायसी क्लिअर असणे गरजेचे आहे. बँकेच्या प्रतिनिधींद्वारे खातेधारक 4000 रुपयांपर्यंत 2000 च्या नोटा बदलून घेऊ शकतात. 2016 साली 500 आणि 1000 च्या जुन्या चलनातील नोटा बंद केल्यानंतर चलनामध्ये 2000 च्या नोटांचा समावेश करण्यात आला होता. आता या 2000 च्या नोटाही तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही वापरू शकता. त्यानंतर त्या अवैध ठरवल्या जातील.
आरबीआयने आर्थिक वर्ष 2018-1019 पासूनच 2000च्या नोटांची छपाई बंद केली आहे. असे म्हणण्यात येत आहे की, 2000 च्या नोटांचा वापर ब्लॅक मनी जमा करण्यासाठी किंवा ब्लॅक मणी व्हाईट करण्यासाठी जास्तीत जास्त केला जातोय, हे पाहता 2000 हजारांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आर्थिक आणि कराच्या बाबतीतले विषेतज्ञ देवेंद्र कुमार मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, 2000 च्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर त्या आरबीआयकडे जमा होतील तेव्हा ब्लॅक मनीच्या संबंधित बरेचसे धागेदोरे सरकारला सापडण्याची दाट शक्यता आहे. त्याबरोबरच डिजिटल व्यवहार आणखी जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Join Our WhatsApp Community