कुपोषित बालकांसाठी रामबाण उपाय कोणता? जाणून घ्या..

163

कुपोषण ही मुलांमधील अजून एक मोठी समस्या आहे. कुपोषणामुळे मुलांमध्ये संसर्ग होण्याची भीती असते. सध्या मुलांमध्ये वाढत्या गोवरच्या केसेसमध्ये जन्मतःच मुलांना न मिळणारा सकस आहार, कुपोषण यामुळे मुलांची तब्येतही गंभीर अवस्थेत पोहोचत असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. कुपोषणामुळे केवळ गोवरच नव्हे तर कोणताही आजार बरे होण्याची शक्यता कमी होते. कुपोषणावर मिलेट्स हे तृणधान्य चांगला रामबाण उपाय ठरेल, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. आहारतज्ज्ञ डॉ. भावना शर्मा यांनी कुपोषणावर मात करण्यासाठी दिलेला सल्ला हा बजेटमध्येही वापरता येतो.

आहारतज्ज्ञांचा सल्ला

मुलांसाठी संतुलित आहाराचे नियोजन करताना त्यांच्या वाढीसाठी आहारात सर्व महत्त्वाचे पोषक घटक समाविष्ट असल्याची खातरजमा करणे गरजेचे असते. मिलेट हा पोषक जिन्नस आहे आणि तो आरोग्यासाठी लाभदायक असतो. यात फायबर, प्रथिने, लोह व कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हा जिन्नस आहारात असणे महत्त्वाचे असते. मुलांच्या पोषण आवश्यकता विशिष्ट असतात, जेणेकरून त्यांची नीट वाढ व विकास होऊ शकेल. मिलेट हे एक आश्चर्यकारक सुपरफुड असून त्यात आवश्यक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. मुलाच्या संतुलित आहारात ही एक चांगली भर असू शकेल. मिलेट हे उत्तम तृणधान्य आहे, ज्यातून मुलांना पुरेसे पोषण मिळते. ते ग्लुटेनमुक्त, पोषक, सहज पचणारे आणि याची ॲलर्जी होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हा जिन्नस अल्पोपहार म्हणूनही खाता येतो आणि मुख्य जेवणाचा घटकही असू शकतो. माता मुलांच्या दररोजच्या डब्यासाठीही मिलेट्सचे पदार्थ देता येऊ शकतात. यात अनेक महत्त्वाच्या पोषक घटकांचे नैसर्गिक गुण आहेत आणि पचायलाही हा जिन्नस हलका असतो. ज्वारी, बाजरी, नाचणी, साव (लिटल मिलेट), कोद्रा (कोडो मिलेट), राळं (फॉक्सटेल मिलेट), वरी(प्रोसो मिलेट) आणि बार्नयार्ड मिलेट ही भारतातील काही मिलेट पिके आहेत. या छोट्या छोट्या दाण्यांमध्ये पोषक घटक, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे पोषणदृष्ट्या हे जिन्नस अधिक चांगले आहेत आणि आता त्यांना न्यूट्रि-सीरिल्स असे म्हटले जाते. मिलेट हे ग्लुटेनमुक्त, पोषक, सहज पचणारे आणि याची ॲलर्जी होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हा जिन्नस अल्पोपहार म्हणूनही खाता येतो आणि मुख्य जेवणाचा घटकही असू शकतो. त्याचप्रमाणे मिलेट्स बहुगुणी आहेत.

(हेही वाचा समृद्धी महामार्गावर शिंदे-फडणवीस एकाच गाडीत, स्टेअरिंग मात्र शिंदेंच्या हाती)

पचनास उपायुक्त

मिलेटमध्ये १५-२०% डाएटरी फायबर असते, जे मुलांच्या पचनआरोग्याला आधार देते आणि प्रिबायोटिक फायबरचा हा उत्तम स्रोत आहे, जो पोटातील चांगल्या जीवाणूंच्या वाढीसाठी मदत करतो. हे जिन्नस नैसर्गिकरित्या ग्लुटेनमुक्त, आम्ल तयार न करणारे जिन्नस असतात आणि पचायला हलके असतात. त्यामुळे मुलांसाठी हे जिन्नस सुयोग्य आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.