World Soil Day म्हणजेच जागतिक मृदा दिवस हा चांगल्या मातीच्या मूल्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि माती संसाधनांच्या व्यवस्थापनास प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. २००२ मध्ये इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉईल सायन्सेस (IUSS) ने मृदा स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of Soil Remembrance) स्थापन करण्याची योजना आखली. (World Soil Day)
आता प्रदूषण आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे दरवर्षी मातीचा दर्जा घसरत चालला आहे. ही एक गंभीर समस्या आहे. मातीच्या ऱ्हासामुळे सेंद्रिय पदार्थांचे नुकसान होते आणि जमिनीची सुपीकता कमी होते. अशा परिस्थितीत लोकांमध्ये याबाबत जागरुकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. जशी पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे, त्याचप्रमाणे माती देखील महत्त्वाची आहे.
भारतात सुमारे ४५ वर्षांपूर्वी ‘माती वाचवा चळवळ’ सुरू झाली. मृदा संवर्धन (Soil Conservation) आणि शाश्वत व्यवस्थापनाकडे लोकांचे लक्ष वेधणे हा त्यामागचा उद्देश आहे. मातीचा ऱ्हास ही एक गंभीर पर्यावरणीय समस्या आहे याबद्दल जागरूकता निर्माण झाली पाहिजे. म्हणूनच हा दिवस खूप महत्त्वाचा आहे.
(हेही वाचा – Chief minister म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणारे Devendra Fadnavis तिसरे!)
मृदा दिन (soil day) साजरा करण्याची पहिली शिफारस २००२ मध्ये करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय मृदा विज्ञानाने प्रथमच ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा करण्याचे आवाहन केले. नंतर २०१३ मध्ये, संयुक्त राष्ट्रसंघाच्या ६८ व्या सर्वसाधारण सभेची बैठक झाली आणि एकमताने जागतिक मृदा दिवस (World Soil Day) साजरा करण्याचे घोषित केले.
हेही पाहा –