महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे. (Rain Forecast) अशातच प्रादेशिक हवामान खात्याने (Department of Meteorology) पुढील २४ तासांसाठी पावसाबाबतचा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार राजधानी मुंबईत हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. “पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे,” अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तसेच मुंबई शहरात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३ अंश सेल्सिअस आणि २७ अंश सेल्सिअसच्या आसपास असणार आहे.
(हेही वाचा – IPL Valuation : आयपीएल स्पर्धेचं मूल्यांकन १६ अब्ज अमेरिकन डॉलरच्या पार)
सोलापूर जिल्ह्याला पावसाने झोडपले
दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात नरखेड आणि बार्शी तालुक्यात पडलेल्या विजांच्या कडकडाटासह झालेल्या रोहिणी नक्षत्राच्या जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. परिणामत: नरखेड परिसरातील ओढ्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले असून पिकांमध्ये, शेतात सर्वत्र पाणी साठून तळ्याचे रूप आले आहे.
सातारा जिल्ह्यात मान्सूनने आनंद आणला असून सर्वदूर पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील टंचाईची दाहकता कमी झाली आहे. मागील आठवड्यापासून तब्बल ७७ गावे आणि २६३ वाड्यांतील ६० टॅंकर बंद झाले आहेत. जिल्ह्यात दमदार पाऊस (Rain Forecast) होत असून महाबळेश्वरला बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक ७५ मिलीमीटरची नोंद झाली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community