भारताची लोकशाही ही जगातली सर्वोत्तम लोकशाही मानली जाते. लोकशाहीत निवडणूक आणि मतदार या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. भारतात दरवर्षी २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन (National Voters Day) साजरा केला जातो. लोक त्यांच्या मतदानाच्या हक्कांबद्दल जागरुक व्हावेत हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. २०११ रोजी भारतात प्रथमच राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.
भारतीय निवडणूक आयोग (ECI) ची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली. म्हणून देखील २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. पूर्वी मतदानासाठी वयाची अट २१ वर्षे होती, पण १९८८ मध्ये ती कमी करून १८ वर्षे करण्यात आली. म्हणजेच आता १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा भारतातील प्रत्येक नागरिक मतदानासाठी पात्र आहे.
(हेही वाचा Ayodhya Ram Mandir : रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला चला!; भाजप ५४३ लोकसभा मतदारसंघात राबविणार मोहिम)
मतदान किंवा निवडणुका हे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत आणि ते सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदार हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. राष्ट्रीय मतदार दिवसाचे (National Voters Day) आयोजन भारताच्या निवडणूक आयोगातर्फे नवी दिल्ली येथे करण्यात येते. चांगले सरकार आणि देशाच्या विकासासाठी मतदान करणे हा भारतीय नागरिकांचा अधिकार आणि कर्तव्यदेखील आहे. हा दिवस तरुण पिढीला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी देखील साजरा केला जातो. दरवर्षी लाखो नवे मतदार तयार होत असतात. ही तरुण पिढी म्हणजे लोकशाहीचा पाया आहे आणि या तरुण पिढीला याबाबत जागरुक करणे अत्यंत महत्वाचे आहे.
Join Our WhatsApp Community