दरवर्षी १७ मे रोजी World Telecommunication Day म्हणजेच जागतिक दूरसंचार दिन साजरा केला जातो. पूर्वी हा दिवस केवळ जागतिक दूरसंचार दिन म्हणून साजरा केला जात होता, परंतु २००६ पासून सामाजिक माहिती दिन (Society information Day) म्हणूनही ओळखला जाऊ लागला.
नोव्हेंबर २००५ मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या (UN) महासभेने १७ मे हा जागतिक दूरसंचार आणि सामाजिक माहिती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. जागतिक दूरसंचार दिन (World Telecommunication Day) १९६९ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. यावेळी ५६ वा जागतिक दूरसंचार दिन साजरा केला जात आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की ३१ जुलै १९९५ रोजी भारतात पहिल्यांदाच दोन व्यक्तींमध्ये फोनवरून संभाषण झाले होते. सुमारे २६ वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय मंत्री सुखराम आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्यात देशातील पहिला फोन कॉल झाला होता.
या दिवशी इंटरनेट आणि माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या वापराबाबत लोकांना जागरूक करणे, लोकांमधील डिजिटल अंतर दूर करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. जागतिक दूरसंचार दिनाचा (World Telecommunication Day) मुख्य उद्देश माहिती आणि संप्रेषण सुलभतेने, विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागात सुलभ करणे असा आहे. आजही जगात अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे माहिती आणि दळणवळण पोहोचलेले नाही. अशा ठिकाणी तंत्रज्ञान नेऊन लोकांमध्ये संवाद वाढवला पाहिजे.
आपल्याकडे भुपेंद्र कुमार मोदी यांनी ही क्रांती घडवून आणली. भुपेंद्र कुमार मोदी हे भारतीय उद्योगपती होते, त्यांनी १९७० च्या दशकात मोदी स्टील कंपनी सुरू केली. त्यानंतर, जवळपास दोन दशकांनंतर, ९० च्या दशकात त्यांनी दूरसंचार क्षेत्रातही प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. देशातील पहिल्या मोबाईल फोन कॉल ऑपरेटरचे ते प्रमुख होते. त्यांच्यामुळे भारतात पहिला फोन कॉल केला गेला. त्यांनी विचारही केला नसेल की भविष्यात प्रत्येकाकडे मोबाईल असेल. आज जग एकमेकांशी जोडले गेले आहे.
Join Our WhatsApp Community