कोरोना काळात इमारत, सोसायट्यांनी कोणती घ्यावी काळजी? वाचा महापालिकेच्या सूचना!

184

मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे आता विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून केले जात असून प्रत्येक इमारतींमध्ये तसेच सोसायट्यांमधील रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता सोसायट्यांसाठी विशेष मार्गदर्शक तत्वे बनवली असून त्याचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

या आहेत सूचना!

  • सोसायटी/वसाहतीमध्‍ये वावरताना प्रत्‍येकाने मास्‍क घालणे बंधनकारक आहे. या नियमाचेे परिपूर्ण पालन होत असल्याची खातरजमा सोसायटीतील सर्वांनी नियमितपणे करावी.
  •  घराबाहेर पडताना प्रत्‍येकाने सॅनिटायझर, मास्‍क व हातमोज्‍यांचा योग्‍यरित्‍या वापर करुन बाहेर पडावे.
  • सोसायटीतील लहान मुले, ज्‍येष्‍ठ नागरिक हे घराबाहेर विनाकारण जाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे.
  • सोसायटी/वसाहतीमध्‍ये दोन व्‍यक्‍तींमध्‍ये किमान सहा फूट अंतर राखूनच संवाद साधावा.
  • सोसायटींमधील प्रतीक्षागृहाचा शक्‍यतो उपयोग करु नये. ते बंदच ठेवावे.
  • सोसायटीत दरवाज्‍याचा कडीकोयंडा, कठडे (हॅण्‍ड रेलिंग), लिफ्ट, बाक, वाहनतळ अशा विविध ठिकाणी कुठेही हात लावणे शक्‍यतो टाळावे.
  • सोसायटीतील उद्वाहन (लिफ्ट) चा उपयोग करताना हातात कागद ठेवावा. लिफ्टची बटणे दाबताना कागदी कपड्यांचा उपयोग करावा. असे कागदी तुकडे वापरानंतर लगेच काळजीपूर्वक कच-याच्‍या डब्‍यात टाकावेत.
  • सोसायटीतून/वसाहतीतून पुन्‍हा घरात येताच कुठेही स्‍पर्श न करता सर्वात आधी साबणाने हात स्‍वच्‍छ धुवावेत.
  • सोसायटीमध्‍ये किंवा परिसरात बाहेरील कोणत्याही व्यक्तीला शक्यतो थेट प्रवेश देऊ नये.
  • बाहेरुन येणारे मदतनीस, वाहन चालक, कचरा संकलक, सफाई कर्मचारी यांच्‍यासाठी शारीरिक तापमान तपासणी, प्राणवायू तपासणी, हात स्‍वच्‍छ धुण्‍याची सोय आदी बाबी उपलब्‍ध असल्‍याची खातरजमा करावी.
  • ऑनलाईन पार्सल मागवल्‍यानंतर, सोसायटीमध्‍ये ते थेट घरात न मागवता, सोसायटीच्‍या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाकडे /सुरक्षित अशा एकाच ठ‍िकाणी ठेवण्‍याची व्‍यवस्‍था करावी. तेथून निर्जंतुकीकरण करुन ते घरात न्‍यावे. शक्‍य असल्‍यास काही तास ते पार्सल खुल्‍या जागेत/ राहू द्यावे आण‍ि नंतर घरात न्‍यावे.
  • सोसायटीतून बाहेर पडताना वाहनांना स्‍पर्श करण्‍यापूर्वी त्‍यांचे निर्जंतुकीकरण करावे.
  • नजीकचे महापालिका आरोग्य केंद्र, रुग्णालय, विभागस्तरीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम), आदी महत्‍त्‍वाचे संपर्क क्रमांक इत्यादी ठळकपणे दिसतील अशा रितीने सोसायटी परिसरात प्रदर्शित करावे.

(हेही वाचा : कोरोना नियंत्रणाबाबत महापालिका हतबल : जनतेवर सोपवली जबाबदारी!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.