वाढत्या स्वाईन फ्लूवर काय काळजी घ्याल…

स्वाईन फ्लू हा हवेवाटे पसरणारा आजार आहे. २००९ साली स्वाईन फ्लूने जगभरात प्रसार केला. स्वाईन फ्लू हा आजार प्रामुख्याने हिवाळ्यात पसरत असला तरी, पावसाळ्यातही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळतात. समशीतोष्ण कटिबंधात हा आजार प्रामुख्याने हिवाळ्यात आणि पावसाळ्यात आढळतो. भारतासारख्या संमिश्र हवामान असलेल्या देशात या आजाराचे रुग्ण वर्षभर आढळतात.

( हेही वाचा : राज्यात कोरोना थांबला तर स्वाईन फ्लूने डोके वर काढले… )

स्वाईनफ्लूच्या आजाराची लक्षणे –

 • ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी, खोकला, थकवा
 • लहान मुलांमध्ये उलटी व जुलाब ही लक्षणे आढळतात

स्वाईन फ्लू आजाराच्या प्रसाराचे माध्यम व निदान –

इन्फ्लूएन्झा या विषाणूमुळे स्वाईन फ्लू आजार होतो. हवेच्या माध्यमातून स्वाईन फ्लू पसरतो. आजारी व्यक्तीच्या शिंकण्यातून तसेच खोकल्यातून उडणा-या थेंबावाटे या आजाराचे विषाणू एका रुग्णापासून निरोगी व्यक्तीकडे जातात. किमान एक ते सात दिवसांत स्वाईन फ्लूची लागण होते.

आरटीपीसीआर तपासणीतून राज्यातील तीन आरोग्य केंद्रात स्वाईन फ्लूच्या रुग्णांचे निदान केले जाते. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, मुंबईतील हाफकिन संशोधन संस्था तसेच कस्तुरबा संसर्गजन्य आजार रुग्णालयात ही चाचणी उपलब्ध आहे.

अतिजोखमीच्या व्यक्ती –

 • ५ वर्षांखालील मुले
 • ६५ वर्षांखालील प्रौढ व्यक्ती
 • दमा, हृदयाचे आजार, मूत्रपिंडाचे विकार, मधुमेह, यकृताचे विकार, रक्त किंवा चेतासंस्थांचे विकार असलेल्या रुग्णांना स्वाईन फ्लूची बाधा होण्याची दाट शक्यता असते
 • सततच्या आजारपणामुळे रोग प्रतिकारकशक्ती कमी झालेल्या, स्टॅरोईड्स प्रकारातील औषधे दीर्घ काळापासून घेणा-या व्यक्ती, एचआयव्ही बाधित रुग्ण

गरोदर महिला किंवा स्थूल व्यक्ती उपचार –

ऑसेलटॅमीवीर व झानामीवीर ही औषधे उपचारासाठी उपलब्ध आहेत. तसेच इंजेक्शनद्वारे तसेच नेसल स्प्रे स्वरुपातील लस उपलब्ध आहे.
काय टाळाल…
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, धुम्रपान टाळा, लक्षणे आढळल्यास गर्दीत मिसळू नका

प्रतिबंधात्मक उपाय –

 • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा
 • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका
 • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
 • वारंवार हात स्वच्छ धुवा, पौष्टिक आहाराचे सेवन करा
 • लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचे सेवन वाढवा
 • धूम्रपान टाळा
 • पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here