महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या रक्षणासाठी काय करावे, याविषयी अनेक जण सूचना करतात, मात्र पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही एक सूचना केली आहे.
जळगावात महिला दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात मंत्री पाटील (Gulabrao Patil) बोलत होते. आज महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता महिलांनी वाघीण झाले पाहिजे. आजची नारी अबला न राहता ती सबला झाली पाहीजे. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात बोलताना बाळासाहेब ठाकरे यांनी वापरलेले वाक्य आपल्याला आठवते. महिलांनी पर्समध्ये लाली पावडर न ठेवता चाकू आणि मिरची ठेवायला हवे, असे जेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तेव्हा विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र, आज खरोखर तशी वेळ आली आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. महिलांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिलांनी आत्महत्या न करता त्यावर उपाय शोधावा टोकाची भूमिका घेऊ नये, असेही पाटील (Gulabrao Patil) म्हणाले.
Join Our WhatsApp Community