अयोध्येतील राम मंदिरामध्ये (Ram Mandir) २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना सोहळा साजरा होणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याचं निमंत्रण रामभक्तांकडून घरोघरी अयोध्येतून पाठवलेल्या अक्षतांसह दिलं जात आहे. या अक्षतांचं काय करायचं, याबाबत काही लोकांमध्ये संभ्रम आहे. जाणून घेऊया, या अक्षतांच्या वापराबाबत –
अक्षता वाटून निमंत्रण देण्याची पद्धत पूर्वापार हिंदू धर्मामध्ये आहे. निमंत्रणाकरिता हळदीमध्ये भिजवलेल्या पिवळ्या तांदळाचा वापर केला जातो. कुठलीही पूजा, अनुष्ठा, धार्मिक कार्य यांचं निमंत्रण अक्षता देऊनच दिलं जातं. आता अयोध्येतून आलेल्या या अक्षतांचं काय करायचं, यासंदर्भातील माहिती पाहूया –
- तांदूळ हे भौतिक सुखाचं प्रतीक मानलं जातं. तांदूळ शुक्र ग्रहाचंही प्रतिनिधित्व करतात. शुक्र ग्रहापासून धनवैभव लक्ष्मी समस्त भौतिक सुखं सुविधा प्राप्त होतात. शुभ लाभासाठी अक्षता लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवू शकता.
- ज्योतिषशास्त्रानुसार, राम मंदिरातून आलेल्या तांदळांना विशेष धार्मिक महत्त्व आहे. यामुळे प्रतिष्ठापनेच्या दिवशी या तांदळाची खीर करू शकता. ही खीर कुटुंबासह प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता.
- शुभकार्यासाठी घरातून बाहेर पडताना या अक्षता टिळा म्हणून कपाळावर लावू शकता.
- कुटुंबातील वधू घरात पहिल्यांदा जेवण बनवताना या तांदळाचा वापर करू शकते. घरात सुखसमृद्धी येण्यासाठी या तांदळाचा वापर करू शकता.