राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या तापमानवाढीचा अभ्यास करणा-या सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी एण्ड पोलिसी या संस्थेने २०५० पर्यंत राज्यातील हवामानाबाबत अनेक धक्कादायक निष्कर्ष मांडले आहेत. गेल्या ३० वर्षांच्या तुलनेत २०५० पर्यंत तापमान २ अंशाने वाढणार आहे. परिणामी, पावसाचे प्रमाण आणि दिवसही वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
( हेही वाचा : उन्हाळा सतावणार आणि पावसाळाही लांबणार )
जाणून घ्या बदलत्या हवामानाचे गंभीर परिणाम –
- महापूर – तापमानवाढीमुळे आणि हवामान बदलांमुळे कमी काळात अधिक पाऊस होईल. पावसाचे दिवस वाढतील. महापूराची संख्याही वाढण्याची भीती आहे. परिणामी, नदीकाठाजवळ वसलेल्या नागरी वसाहतींच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. माणसांना विस्थापनाशिवाय पर्याय राहणार नाही.
- शेती – शेतीतील विविध पिकांच्या उत्पादनासाठी कमी-अधिक तापमानाची आणि पिकनिहाय पावसाच्या प्रमाणाचीही गरज भासते. तापमान वाढत राहिले, पाऊसही मोठ्या प्रमाणात होत राहिला तर पिकांची नासाडी होईल. रोगराईचे प्रमाण वाढेल. कृषीक्षेत्राचे अतोनात नुकसान होईल.
- जंगल आणि वन्यप्राण्यांवर परिणाम – वाढत्या तापमानवाढीमुळे परिसंस्था नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. वृक्षावर किटकांचे प्रमाण वाढेल. वन्यप्राण्यांच्या रोगराईवरही प्रमाण वाढेल. वणव्याचे प्रमाणही वाढेल
- आरोग्य – वाढत्या तापमानवाढीचे वातावरण विविध जीवाणू आणि विषाणूंना पोषक ठरेल. रोगराईत वाढ होईल. अतितापमानवाढीमुळे आणि उष्ण लहरीमुळे माणसांच्या मृत्यूच्या घटना वाढतील. माणसाच्या कामाच्या तासाचे वेळापत्रक बिघडेल. अर्थव्यवस्था कोलमडून पडेल.
विकास कामावर परिणाम –
सततच्या पावसामुळे उद्योग आणि विकास कामांचे नुकसान होईल. रस्ते, पूल, वीज, दळणवळण, दूरसंचार आदी महत्त्वाच्या नागरी सुविधांही कोलमडतील.
तज्ज्ञांचे मत
ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष व पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांच्या मते, हा प्रश्न जागतिक पातळीवर प्रत्येक देशांत आ वासून उभा आहे. जगभरात वाढलेला उद्योगसमूहातून वाढलेले प्रदूषण, त्यातून उत्सर्जित होणारे प्रदूषित वायू, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे अगोदरच धोक्याच्या पातळीवर आहे.
अर्बन हीट वाढत आहे
तापमान नियंत्रणात ठेवणा-या जंगलातील घनदाट वृक्षांची बेसुमार तोड वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीवर अतिक्रमण होत अर्बन हीट वाढत असल्याची माहिती प्रा. चोपणे यांनी दिली.
तातडीचे उपाय
- औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांतून तसेच थर्मल पॉवर स्टेशनमून उत्सर्जित होणारे प्रूदूषकांचे उत्सर्जन कमी करणे.
- शहरांत, ग्रामीण भागांत, शेती आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करा
- जंगलक्षेत्र वाढवा, जलसाठा वाढवा,
- निसर्गपूरक जीवनशैली आत्मसात करा
Join Our WhatsApp Communityराज्य सरकारने हवामान बदलांचा अभ्यास करावा, त्यासाठीचा आवश्यक कृती आराखडा तयार करावा. उपायांची अंमलबजावणी करावी.
प्रा. सुरेश चोपडे, हवामान अभ्यासक आणि अध्यक्ष, ग्रीन प्लानेट सोसायटी