विकेंड लॉकडाऊन: काय सुरू, काय बंद? वाचा आणि कन्फ्यूजन दूर करा!

आपणही आता कोरोना विरुद्धच्या या युद्धात सरकारसोबत सज्ज राहायचं आहे. म्हणूनच या विकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरू आणि काय बंद राहणार याची संपूर्ण माहिती.

पुन्हा आक्रमण केलेल्या कोरोनाला नेस्तनाभूत करण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक दि चेनचे शस्त्र हाती घेतले आहे. शनिवार आणि रविवार राज्यात कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हे निर्बंध असणार आहेत. हा आठवडा या विकेंड लॉकडाऊनचा पहिला आठवडा असणार आहे. त्यामुळे आपणही आता कोरोना विरुद्धच्या या युद्धात सरकारसोबत सज्ज राहायचं आहे. म्हणूनच या विकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरू आणि काय बंद राहणार याची संपूर्ण माहिती.

हे सुरू राहणार

 1. फक्त वैध कारण असणाऱ्या नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी
 2. वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा आणि त्याच्याशी निगडीत लोकांना विकेंड लॉकडाऊनमधून असणार सूट
 3. विकेंड लॉकडाऊनमध्ये रुग्णालय, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक, मेडिकल, मेडिकल इन्शुरन्स ऑफिस, फार्मा कंपन्या, मेडिकल आणि हेल्थ सर्विस यांना सूट
 4. किराणा, भाजीपाल्याची दुकान, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थांची दुकाने हे देखील सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू
 5. विकेंड लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतुकीतील ट्रेन, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बसेस सुरू
 6. माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांना विकेंड लॉकडाऊनमध्ये परवानगी
 7. शेतीशी निगडीत सेवा सुरू
 8. ई-कॉमर्स सेवा सुरू
 9. मीडियाला परवानगी
 10. सकाळी ७ ते रात्री ८ वाजतेपर्यंत वृत्तपत्रांच्या होम डिलिव्हरीला परवानगी
 11. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या सेवा सुरू राहतील
 12. बांधकाम सुरू
 13. कारखाने सुरू

(हेही वाचाः राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन?)

हे बंद राहणार

 1. खाजगी वाहने किंवा खाजगी बसेस बंद
 2. सिनेमा हॉल, नाट्यगृहे, अम्युझमेंट पार्क, व्हिडिओ गेम पार्लर बंद
 3. वॉटर पार्क, क्लब, स्विमिंग पूल, जिम, स्पोर्ट्स कॉम्पलेक्स बंद
 4. विकेंड लॉकडाऊनमध्ये हॉटेलमधील पार्सल सेवा देखील बंद
 5. सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत फक्त होम डिलिव्हरी सुरू
 6. कोणत्याही रेस्टॉरंट, बारमध्ये ग्राहकाला आपली ऑर्डर घेण्यासाठी जाता येणार नाही.
 7. सर्व धार्मिक स्थळं बंद, फक्त नित्य पूजा आणि प्रार्थनेला संबंधितांच्या उपस्थितीत परवानगी
 8. सलून, स्पा, ब्यूटी पार्लर बंद
 9. शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस बंद
 10. सर्व राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here