फसव्या, स्पॅम कॉल्सचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. हा त्रास कायमचा संपुष्टात येणार आहे. व्हॉट्सअॅप आणि ट्रु कॉलर एकत्र येऊन एक नवीन फिचर घेऊन येत असून या फसव्या, स्पॅम कॉल्सच्या त्रासापासून नागरिकांची सुटका लवकरच होणार आहे. या फिचरमुळे फसवे, स्पॅम कॉल्स ओळखण्यास मदत होणार आहे.
हे नवे फिचर ऑडिओ तसेच व्हिडिओ या दोन्ही प्रकारच्या कॉल्ससाठी असणार आहे. ट्रु कॉलरमुळे अनोळखी कॉल करणा-यांची ओळख पटविण्यात येते, पण या नव्या फिचरमुळे अजून त्याची व्याप्ती वाढणार आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून व्हॉट्सअॅपवर फेक कॉल्सचे प्रमाण वाढल्याच्या अनेक तक्रारी आपण पाहिल्या आहेत. त्यातले बहुतांशी कॉल्स हे आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन येत असल्याची तक्रार अनेक वापरकर्त्यांनी केली आहे. जगभरात स्पॅम आणि टेलिमार्केटिंग कॉल्सचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ते कमी करण्यासाठी दूरसंचार नियामकने ‘एआय’ चा वापर करण्याचे निर्देश सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सला दिले आहेत. अशा प्रकारची सेवा देण्यासाठी ट्रु कॉलर या कंपन्यांसोबत चर्चा सुरु आहे.
(हेही वाचा Aurangzeb : एमआयएमचे पुन्हा उफाळून आले औरंग्यावरील प्रेम; शहराध्यक्ष फोटो घेऊन नाचला )
Join Our WhatsApp Community