- ऋजुता लुकतुके
व्हॉट्सॲपने फेव्हरिट हे नवीन फिचर ग्राहकांना उपलब्ध करून दिलं आहे. त्यामुळे तुम्हाला हवे असणारे चॅट्स किंवा समुह तुम्ही प्राधान्यक्रमाने वर ठेवू शकाल. टप्प्या टप्प्याने सर्व ग्राहकांना हे फिचर वापरता येईल. या फिचरचा वापर करण्यासाठी ग्राहकांना चॅट पेजवर फेव्हरिट हे बटन क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हा हवा असलेला नंबर किंवा समुह तुम्ही त्यात ॲड करू शकता. (Whatsapp Favorite Feature)
व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये तुमचे फेव्हरिट एडिट करण्याचीही सोय असेल. तुम्ही कधीही तुमचे फेव्हरिट बदलू शकाल किंवा त्यात नवीन भर घालू शकाल. व्हॉट्सॲप (Whatsapp) कॉल तसंच चॅट या दोन्हीसाठी तुम्ही फेव्हरिट पर्याय वापरू शकाल. फेव्हरिट टॅब ओपन केल्यावर तुम्हाला प्राधान्यक्रमाने तेच संदेश आणि कॉल दिसतील. (Whatsapp Favorite Feature)
(हेही वाचा – Cabinet Reshuffle and Expansion : राज्य मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्तार लवकरच; कुणाला मिळणार संधी?)
तीन महिन्यांपूर्वीही व्हॉट्सॲपने (Whatsapp) असेच काही फिल्टर ग्राहकांसाठी आणले होते. त्यात ‘वाचलेले,’ ‘न वाचलेले,’ व ‘सर्व’ असे संदेश वर्गीकरण करणं सोपं केलं होतं. आता हे नवीन फिचर त्यांनी सुरू केलं आहे. जून महिन्यातच कंपनीने व्हॉट्सॲपच्या व्हिडिओ कॉलमध्येही काही महत्त्वाचे बदल केले आहेत. आता व्हिडिओ कॉलमध्ये एकाच वेळी ३२ जण भाग घेऊ शकतात. तर स्क्रीन शेअर करताना तुमचा आवाजही शेअर होऊ शकतो. (Whatsapp Favorite Feature)
व्हिडिओ कॉलवर जी व्यक्ती बोलत असेल तिचं नाव ठळकपणे येण्याचं फिचरही अलीकडेच सुरू झालं होतं. तर व्हिडिओ कॉल दरम्यान आवाजाचा दर्जा सुधारण्यासाठी कोडेकमध्येही कंपनीने बदल केले आहेत. मेटाएल हा कमी बिटरेट असलेला कोडेक त्यासाठी कंपनीने लाँच केला आहे. व्हॉट्सॲप ही कंपनी मेटाच्या मालकीची आहे आणि फेसबुक, इन्स्टाग्राम तसंच व्हॉट्सॲप ही कंपनीची प्रमुख उत्पादनं आहेत. (Whatsapp Favorite Feature)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community