हे आहेत व्हॉट्सअ‍ॅपचे नवे भन्नाट फिचर्स!

103

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम हे विविध अ‍ॅप्स सामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. जगभरातील लाखो युजर्स दैनंदिन जीवनात संवाद साधण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करतात. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सच्या फायद्यासाठी अनेक नवनवीन फिचर्स लॉंच करत आहेत. या नवीन फीचर्सचा फायदा कोट्यवधी यूजर्सला होणार आहेत. यामुळे व्हॉइस नोट्स (Voice notes) पाठवणे आणि रिसिव्ह करणे अधिक सोयीचे होणार आहे.

( हेही वाचा : ‘ही’ चूक तुम्ही करू नका… कारण थेट दाखल होईल आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा! )

व्हॉइस मेसेज (Voice message) पाठवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने नवे फिचर्स लॉंच केले आहेत

  • आउट ऑफ चॅट प्लेबॅक या फिचरमुळे व्हॉइस मेसेज ऐकताना आपण मल्टीटास्किंगसह इतर लोकांनाही मेसेज करू शकतो.
  • पॉज आणि रिज्यूम या फिचरमुळे आपण व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करताना मध्येच पॉज (Pause) म्हणजेच थांबू शकतो. यामुळे आपण सोयीनुसार resume व pause करत व्हाइस रेकॉर्डिंग करू शकतो.
  • वेवफॉर्म व्हिज्यूअलायजेशन आणि ड्राफ्ट प्रिव्ह्यू या फिचरमुळे व्हॉइस नोट पाठवण्याआधी यूजर्सला ड्राफ्ट प्रिव्ह्यूमध्ये ते ऐकता देखील येईल.
  • रिमेंबर प्लेबॅक आणि फास्ट प्लेबॅक ऑन फॉरवर्ड मेसेज या फिचरमुळे यूजर्सला व्हॉइस मेसेज १.५x आणि २x या स्पीडवर प्ले करण्याची सुविधा लवकरच मिळणार आहे. हे फिचर अद्याप लॉंच झालेले नाही. लवकरच सर्व यूजर्ससाठी हे फीचर उपलब्ध होतील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.