WhatsApp New Feature : व्हॉट्सॲप चॅट आता दिसणार इन्स्टाग्रामसारखं?

WhatsApp New Feature : व्हॉट्सॲपमध्ये एक नवीन चॅट थीम आणली जाणार आहे.

161
Supreme Court : ‘व्हॉट्सॲप’ बंद करणारी याचिका फेटाळली
Supreme Court : ‘व्हॉट्सॲप’ बंद करणारी याचिका फेटाळली
  • ऋजुता लुकतुके

व्हॉट्सॲपचा (WhatsApp New Feature) नवीन अपडेट लवकरच येणार आहे. यावेळी व्हॉट्सॲप चॅटिंगचा तुमचा अनुभवच बदलेल असे फिचर कंपनी लाँच करण्याच्या विचारात आहे. अँड्रॉईड तसंच आयओएस प्रणालीसाठीही हे अपडेट उपलब्ध करून दिले जातील. या अपडेट्समध्ये ग्राहकांचा चॅट अनुभव हा इन्स्टाग्राम सारखा रंगांनी आणि इमोजींनी तसंच व्हिडिओंनी भरलेला असेल असं कंपनीचं म्हणणं आहे. डब्ल्यूए बिटाइन्फो या वेबसाईटने याविषयीची बातमी देतानाच नवीन चॅटिंग कसं असेल याची झलकही दिली आहे.

इन्स्टाग्रामप्रमाणेच संदेशासाठीचा रंग निवडण्याची मुभा ग्राहकांना असेल. तसंच व्हिडिओचा वापरही अधिक सोपा झालेला असेल. सध्या या नवीन फिचरची चाचणी सुरू असल्याचं दिसतंय. कारण, डब्ल्यूए बिटाने आपल्या साईटवर नवीन अपडेटचे काही फोटोही शेअर केले आहेत. अँड्रॉईड आणि आयओएसच्या काही बिटा व्हर्जन असलेल्या फोनवर सुरुवातीला हे फिचर उपलब्ध झाले आहेत. चाचणीनंतर ते सगळ्यांसाठी आणले जातील. (WhatsApp New Feature)

(हेही वाचा – Kolkata Doctor Case : डॉक्टरांना जगू द्या! कोलकाता प्रकरणावर आयएमए अध्यक्षांचे भावनिक पत्र)

सध्या व्हॉट्सॲप (WhatsApp New Feature) चॅटबॉक्समध्ये तुम्ही तुम्हाला हवा तो वॉलपेपर निवडू शकता. पण, त्यामुळे चॅट बबलचा रंग बदलत नाही. तो आहे तोच राहतो. मेटा कंपनीच्या इतर ॲपमध्ये वॉलपेपरला अनुसुरून रंग बदलण्याची सोय आहे. आता तशीच सुविधा व्हॉट्सॲपमध्येही मिळणार आहे. वॉलपेपरला साजेसा चॅट बबलचा रंग तुम्ही निवडू शकता किंवा कंपनी तो तुम्हाला आपोआप निवडून देईल.

थोडक्यात, तुमच्या चॅटबॉक्सचा व्हिज्युअल लुक कसा असावा याचं नियंत्रण आता ग्राहकांच्या हातात असणार आहे. त्याचबरोबर व्हॉट्सॲपवर व्हिडिओ शेअर करणं सोपं जावं आणि मोठे व्हिडिओही शेअर करता यावेत यासाठीही कंपनीचा प्रयत्न सुरू आहे. (WhatsApp New Feature)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.