WhatsApp New Features : आता व्हॉट्सअॅपवर तारखेने शोधता येणार एखादा संदेश

मेटा कंपनी व्हॉट्सअॅप काही नवीन फिचर्स लाँच करायच्या तयारीत आहे

996
Supreme Court : ‘व्हॉट्सॲप’ बंद करणारी याचिका फेटाळली
Supreme Court : ‘व्हॉट्सॲप’ बंद करणारी याचिका फेटाळली
  • ऋजुता लुकतुके

मेटा कंपनी व्हॉट्सअॅप काही नवीन फिचर्स लाँच करायच्या तयारीत आहे

मेटा कंपनीने व्हॉट्सअॅप या आपल्या उत्पादनात काही नवीन फिचर्स आणण्याची तयारी सुरू केली आहे. यात व्हॉट्सअॅप चॅनलवर अलर्टची सोय, तारखेनं संदेश शोधता येणं अशा गोष्टींचा समावेश आहे. सुरुवातीला या सुविधा अँड्रॉईड फोन धारकांना उपलब्ध होतील.

व्हॉट्सअॅप बिटान्यूज या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, चॅनलवर अलर्टची सुविधा काही अँड्रॉईड फोनमध्ये सुरूही झाली आहे. तुम्ही फोनमधील व्हॉट्सअॅप व्हर्जन अपडेट केलंत की, त्याचा लाभ तुम्हाला मिळेल. आता हळूहळू सगळ्याच अँड्रॉईड फोनमध्ये हे फिचर सुरू होईल. यामुळे नवीन सुरू झालेला एखादा व्हॉट्सअॅप चॅनलचं अलर्ट तुम्हाला येईल. आणि विविध चॅनलबद्दलची माहितीही अलर्ट द्वारे मिळू शकेल.

(हेही वाचा – Karnataka Politics : कर्नाटकात पुन्हा राजकीय नाट्य होणार ? कुमारस्वामी यांचा मोठा दावा)

खासकरून चॅनल चालवणाऱ्यांना यातून फायदा होणार आहे. आपल्या चॅनलवरील माहिती इतरांपर्यंत पोहोचवणे तसंच आपलं चॅनल कसं सुरू आहे, याची माहिती वेळोवेळी घेणं यासाठी हे फिचर उपयोगी पडेल. अलर्टमधून चॅनल चालवणाऱ्यांना कायदेशीर माहितीही मिळेल. चॅनलने व्हॉट्सअॅपचा कोणताही नियम मोडला असेल आणि त्यामुळे चॅनल निलंबित झालं असले तर ती माहिती या यंत्रणेमुळे त्यांना मिळेल. त्यातच चॅनल चालवणारी व्यक्ती व्हॉट्सअॅपला संपर्क करून आपलं म्हणणं त्यांना समजावून सांगू शकेल.

युट्यूब चॅनलवर अशी सोय आहे. आता ती व्हॉट्सअॅपवरही उपलब्ध होईल. तर नियमित ॲपसाठीही दोन महत्त्वाचे बदल मेटा कंपनी आणणार आहे. यातील पहिला बदल म्हणजे, स्क्रीन स्क्रोल करताना वरचा नेव्हिगेशन बार आणि लेबल आता दिसेनासं होईल. त्यामुळे चॅट्सची जागा वाढेल आणि चॅट्स मोठे दिसतील. तर दुसरा बदल म्हणजे तारखेनं चॅट शोधणं आता शक्य होईल. या सुविधाही सुरुवातीला अँड्रॉईड फोनवर वापरता येतील आणि हळू हळू सर्व प्रकारच्या मोबाईल फोनना ही सुविधा देण्यात येईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.