WhatsApp Status ची लिमिट वाढली ; आता ६० सेकंदांऐवजी …

WhatsApp Status ची लिमिट वाढली ; आता ६० सेकंदांऐवजी ...

153
WhatsApp Status ची लिमिट वाढली ; आता ६० सेकंदांऐवजी ...
WhatsApp Status ची लिमिट वाढली ; आता ६० सेकंदांऐवजी ...

काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामसारखे स्टेटसला गाणी लावण्याचे नवीन फीचर व्हाट्सॲपवर (WhatsApp Status) आले होते. यातच आता व्हाट्सॲपने वापरकर्त्यांना पुन्हा खूशखबर दिली आहे. जर तुम्ही WhatsApp वर मोठा व्हिडीओ स्टेटसला टाकण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मेटा आपल्या WhatsApp प्लॅटफॉर्मवर स्टेटस लिमिट वाढवणार आहे. अनेकदा स्टेटसवर व्हिडीओ हे कट करून लावावे लागत होते. पण यामुळे युजर्सना फायदा होईल. (WhatsApp Status)

हेही वाचा-Amravati Airport : अमरावती विमानतळावर पहिल्या प्रवासी विमानाचं लॅन्डिंग ; १० तासांचा प्रवास आता २ तासांवर

आतापर्यंत तुम्ही WhatsApp स्टेटसवर एका वेळी ६० सेकंदांचा व्हिडीओ टाकू शकत होता. त्याची लिमिट वाढवण्यात येत आहे. तुम्ही तुमच्या WhatsApp स्टेटसमध्ये ६० सेकंदांऐवजी ९० सेकंदांचा व्हिडीओ टाकू शकता. हे फीचर सध्या बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहे. बीटा युजर्स हे ॲपच्या टेस्टिंग व्हर्जनचा वापर करत असतात. कोणत्याही ॲपच्या बीटा व्हर्जनमध्ये बग्स असू शकतात. अशा परिस्थितीत, कंपन्या युजर्सना मुख्य व्हर्जन प्रदान करतात. बीटा व्हर्जनवर हे फीचर आल्याने ते लवकरच सर्वसामान्यांसाठी देखील उपलब्ध होईल. (WhatsApp Status)

हेही वाचा- “काँग्रेस मुर्शिदाबादबाबत गप्प , ज्यांना बांगलादेश आवडतो त्याने निघून जावे” ; CM Yogi Adityanath कडाडले

WhatsApp च्या या लेटेस्ट फीचरची माहिती WABetaInfo नावाच्या विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे. हे फीचर WhatsApp चं अँड्रॉइड व्हर्जन २.२५.१२.९ वर उपलब्ध असेल. या अपडेटनंतर युजर्स त्यांच्या स्टेटसमध्ये एकाच वेळी ९० सेकंदांचा व्हिडीओ टाकू शकतील. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला ३० सेकंदांची मर्यादा १ मिनिटापर्यंत वाढवण्यात आली होती. (WhatsApp Status)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.