Whatsapp’s New Feature: Whatsapp वर आता लपवता येणार आपला फोन नंबर

104

आपला मोबईल क्रमांक लपवून ठेवण्याची सोय असलेले फिचर Whatsapp कडून आणले जात आहे. अनोळखी लोकांच्या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्यांसाठी हे फिचर विशेष उपयुक्त ठरणार आहे. वाबीटाइन्फोने आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटले की, व्हाॅट्सअॅप हायडिंग फोन नंबर नावाच्या फिचरवर काम करत आहे. या फिचरला सेक्शन ग्रुप इन्फोर्मेशनमध्ये जाऊन शोधले जाऊ शकते.

कोणते फिचर?

हायडिंग फोन नंबर नावाच्या या फिचरवर व्हाॅट्सअॅप काम करत आहे. ते वापरात आल्यानंतर ग्रुपमधील इतर वापरकर्ते तुमचा मोबाईल क्रमांक पाहू शकणार नाहीत.

कधी येईल?

हे फिचर सध्या डेव्हल्पमेंट स्टेजला आहे. लवकरच त्याच्या चाचण्या होतील. त्यानंतर ते जारी केले जाईल. व्हाॅट्सअॅपच्या आगामी फिचर्सचा लेखाजोखा ठेवणारी वेबसाईट वाबीटाइन्फोने याबाबतची माहिती दिली आहे.

( हेही वाचा: आता FASTag जाणार! Recharge चीही गरज नाही, मग टोल कसा भरणार? )

कोणासाठी महत्त्वाचे?

अनेकदा एखादी अनोळखी व्यक्ती वापरकर्त्यास एखाद्या व्हाॅटस्अॅप ग्रुपमघ्ये सहभागी करुन घेते. मात्र, तेथे गेल्यानंतर लक्षात येते की, या ग्रुपमधील बहुतांश लोक अनोळखी आहेत. अनोळखी लोकांना आपला मोबाईल क्रमांक कळू देणे वापरकर्त्यास योग्य वाटत नाही. अशावेळी त्याच्याकडे योग्य पर्याय नसतो. एक तर समुहातून बाहेर पडणे किंवा समुहात राहून मोबाईल क्रमांक सर्वांसाठी उपबल्ध ठेवणे, असे दोनच पर्याय त्यांच्यासमोर असतात. अशा प्रसंगी नवे फिचर वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.