केंद्र सरकारने नुकतीच गव्हाच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. परिणामी चारच दिवसांत गव्हाच्या किमतीत क्विंटलमागे तब्बल २५० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून शासनाच्या किमान बाजारभावापेक्षा क्विंटलमागे ४५० रुपये भाव अधिक मिळत असल्याने आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने ही दरवाढ झाली आहे.
गव्हाच्या किमतीत वाढ
यंदाचा नवीन गहू बाजारपेठेत येण्यासाठी पंधरवडा ते महिनाभराची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे वाढलेले दर किमान महिनाभर तरी चढते राहतील, असा जाणकारांचा अंदाज आहे. ही दरवाढ थांबणे निर्यात बंद झाल्यावरील स्थितीवर अवलंबून असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या शुक्रवारी ४ मार्च रोजी गव्हाचे घाऊक बाजारातील दर २३०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल होते. तर ते शुक्रवारी २६०० ते २९०० च्या दरम्यान पोहोचले आहेत. केंद्र शासनाने भारतातून इतर देशांना गव्हाची निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. देशातील प्रमुख पाच ते सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी राजस्थान व मध्य प्रदेश या प्रमुख बाजारपेठांत गव्हाची खरेदी सुरू केली आहे. या कंपन्यांनी किमान बाजारभावापेक्षा साडेचारशे रुपये अधिक भाव देऊ केला आहे. त्यामुळे बहुतांश माल हा बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे विकला जात आहे. त्याचे पडसाद म्हणून नियमित बाजारपेठेत गहू येत नाही. मागणी असताना पुरवठा होत नसल्याने ही दरवाढ होते आहे.
( हेही वाचा : भारत आणि अमेरिकेत ‘या’ विषयावर झाला समंजस्य करार! )
Join Our WhatsApp Community