Mumbai High Court : फुटपाथवरील लोखंडी खांबांचा व्हीलचेअरसाठी अडथळा; उच्च न्यायालयात जनहित याचिका

119
Mumbai High Court : नियमांचे पालन करा; 'या' वयानंतर अनुकंपा नोकरी नाही - मुंबई उच्च न्यायालय
Mumbai High Court : नियमांचे पालन करा; 'या' वयानंतर अनुकंपा नोकरी नाही - मुंबई उच्च न्यायालय

मुंबईतील फुटपाथवर वाहने चढू नयेत, यासाठी लावण्यात आलेले लोखंडी खांब व्हिलचेअरसाठी अडथळा ठरत आहेत. (Mumbai High Court) हा मुद्दा खड्डे आणि उघडी मॅनहोल या प्रकरणांत कोर्टाला अमायकस क्युरी (कोर्टाचा मित्र) म्हणून मदत करत असलेल्या मिस्त्री यांनी उपस्थित केलेल्या या मुद्याची खंडपीठाने गंभीर दखल घेतली. अ‍ॅड जमशेद मिस्त्री यांनी ही बाब मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार व महापालिका प्रशासनाला 18 ऑक्टोबरच्या पुढील सुनावणीत भूमिका स्पष्ट करण्याची नोटीस जारी केली आहे. (Mumbai High Court)

(हेही वाचा – Western Railway : लोकल ट्रेन रुळावरुन घसरली, पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत)

22 सप्टेंबर 2023 रोजी करण सुनील शहा यांनी जमशेद मिस्त्री यांना एक ई मेल पाठवून या प्रकरणाकडे लक्ष वेधले. शहा हे व्हीलचेअरचा वापर करतात. मुंबईतील काही पदपथांवर सध्या लोखंडी खांब लावण्यात आले आहेत. वाहनांपासून पदपथ अधिक सुरक्षित करण्यासाठी हे खांब लावले गेले आहेत. याचा नाहक त्रास व्हिलचेअरचा वापर करणा-यांना होत आहे. या खांबांमुळे त्यांना पदपथावर जाता येत नाही, असे या ई-मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या ई मेलसोबत जोडलेल्या फोटोमध्ये २ खांबांमधील अंतर खूप कमी असल्याचे दिसत आहे. त्या २ खांबामधून  व्हिलचेअर जात नाही. याचा किती आणि कसा अडथळा व्हिलचेअरला होतो, हे या फोटोतून स्पष्टपणे दिसत आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश नुकतेच दिले आहेत, असेही जमशेद मिस्त्री यांनी हायकोर्टाला सांगितले. हे प्रकरण सुओमोटो याचिका म्हणून हायकोर्टाने सुनावणीसाठी दाखल करून घेतले आहे. यात अ‍ॅड. मिस्त्री यांचीच कोर्टाचा मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खड्डे आणि उघडी मॅनहोल या प्रकरणांत कोर्टाला अमायकस क्युरी (कोर्टाचा मित्र) म्हणून मदत करत असलेल्या मिस्त्री यांनी उपस्थित केलेल्या या मुद्याची खंडपीठाने गंभीर दखल घेतली. (Mumbai High Court)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.