मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईत जागा वाटपावर आम्ही नाराज आहोत असे स्पष्ट करत याबाबत पक्ष श्रेष्ठींकडे माझे म्हणणे मी मांडले असल्याचा सांगण्याचा प्रयत्न पत्रकार परिषदेत केला. परंतु महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उबाठा पक्षाने चार लोकसभा मतदार संघांमध्ये आपले परस्पर उमेदवार घोषित केले तेव्हा गायकवाड यांनी विरोध का दर्शवला नाही असा सवाल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मुंबईतील जास्तीत जास्त जागा ठाकरेंच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न गायकवाड यांच्याकडून झाला असून आता स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी ते नाराजी नाट्याचा भाग रंगवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून खासगीत बोलले जात आहे. (Varsha Gaikwad)
मुंबईत पक्षाला प्रतिनिधित्व मिळावे ही अपेक्षा होती.
काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड या मागील दोन दिवसांपासून जागा वाटपाबाबत नाराज असल्याच्या बातम्या होत आहेत. त्यातच गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन नाराजीबाबतची भूमिका मांडली. मुंबईत अनेक ठिकाणी आमच्या पक्षाचे संघटन आहे. त्यामुळे मुंबईत पक्षाला प्रतिनिधित्व मिळावे ही अपेक्षा होती. मुंबईत कोणत्या जागा हव्या होत्या, ते पक्षातील श्रेष्ठींना सांगितले होते. जो उमेदवार जिंकणार आहे, त्याला तिकीट द्यावे ही अपेक्षा होती. महाविकास आघाडीसोबत जागा वाटपावर चर्चा करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने कठोर भूमिका घ्यायला हवी होती. या जागा वाटपाच्या वेळी मलाही विश्वासात घेतले गेले नाही, अशा शब्दांत गायवाकड यांनी नाराजी व्यक्त केली. (Varsha Gaikwad)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक)
मुंबई अध्यक्षा गप्प का राहिल्या ?
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या खासगीतील चर्चेनुसार मुंबईतील सहाही लोकसभा मतदार संघ ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्याबाबत ठाकरे आणि गायकवाड यांच्यामध्ये तडजोड झाली आहे. त्यामुळे चार लोकसभा मतदार संघांमध्ये शिवसेना उबाठा पक्षाने चार उमेदवार घोषित केल्यानंतरही काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा गप्प का राहिल्या आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही गप्प बसले होते. पण त्यावेळी त्यांनी का आवाज उठवून नाराजी व्यक्त केली नाही असा सवालही त्यांनी केला. (Varsha Gaikwad)
शिवसेना पक्ष फुटलेला आहे, पण काँगेस पक्ष फुटलेला नाही!
काँग्रेस पक्षाच्या वाट्याला उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई हे दोन मतदार संघ आल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. या कार्यकर्त्यांमधील या नाराजीमुळे मुंबई अध्यक्षांच्या खुर्चीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच आपली खुर्ची वाचवण्यासाठी वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) या आता उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. पण ही नाराजी म्हणजे केवळ नाटक असून त्यांना काँग्रेसची चिंता नाही तर त्यांना आपल्या खुर्चीची चिंता आहे. शिवसेना पक्ष फुटलेला आहे, पण काँगेस पक्ष फुटलेला नाही. पण फुटलेला पक्ष आज मुंबईत चार जागा घेऊन जातो आणि काँग्रेसच्या वाट्याला केवळ पडेल अशा तीन जागा सोडल्या जातात. यासर्व सर्व बैठकींना स्वत: मुंबई अध्यक्षा उपस्थित होत्या आणि आता मुंबई प्रदेश काँग्रेस पक्षावर खापर फोडले जात आहे. पण मुंबईतील धारावी विधानसभा मतदार संघ सुरक्षित राखण्यासाठी गायकवाड यांनी शिवसेनेकडून उमेदवार घोषित होत असताना गप्प राखण्याची भूमिका घेतल्याचेही बोलले जात आहे. (Varsha Gaikwad)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community