महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहे. मात्र अद्याप राज्य पोलीस दलाचा प्रमुख पदाचा तिढा मात्र अद्याप कायम आहे. पोलीस महासंचालक पदासाठी जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे नाव सर्वात पुढे होते, परंतु त्यांना पोलीस महासंचालक पदापेक्षा मुंबईच्या पोलीस आयुक्तपदामध्ये अधिक रस असल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे. (Maharashtra Police)
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहे, सेठ यांना दोन महिन्यापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग महामंडळाचे अध्यक्ष पद देण्यात आल्यानंतर पोलीस महासंचालक पदी जेष्ठ आयपीएस रश्मी शुक्ला यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. शुक्ला यांची या पदासाठी निवड देखील करण्यात आली होती असे एका राजकीय नेत्याच्या ट्विट मुळे समोर आले होते. (Maharashtra Police)
रश्मी शुक्ला मुंबईच्या पोलिस आयुक्त पदासाठी बसल्या अडून
रश्मी शुक्ला या सध्या केंद्रात प्रती नियुक्तीवर आहेत, व राज्य पोलीस महासंचालक पद त्यांना नको असून त्या मुंबईचे पोलिस आयुक्त पदासाठी अडून बसल्या आहेत अशी चर्चा मागील दोन महिन्यापासून पोलीस दलात सुरू आहे. परंतु आता येत्या दोन दिवसात रजनीश सेठ हे सेवानिवृत्त होत असून शुक्रवारी (२९ डिसेंबर) मुंबईच्या नायगाव पोलिस मैदानात यांची सेवा निवृत्ती परेड पार पडली आहे, यामुळे सेठ यांना कालावधी वाढवून मिळणार या चर्चेला विराम मिळाला आहे. (Maharashtra Police)
२०२४ च्या पहिल्या आठवड्यात राज्य पोलीस दलात मोठा बदल होण्याची शक्यता
सेठ यांच्या सेवानिवृत्तीला अवघे दोन दिवस उरलेले असताना अद्याप महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक पदाचा तिढा अद्याप काही सुटलेला नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार नवीन वर्ष २०२४ च्या पहिल्या आठवड्यात राज्य पोलीस दलात मोठा बदल होण्याची शक्यता आहे, मुंबई तसेच राज्यातील काही आयपीएस दर्जाच्या अधिकारी यांच्या बदलीचे संकेत असून राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांचीच निवड होणार असून मुंबईतील पोलीस आयुक्त यांची बदली होण्याची शक्यता आहे, तसेच मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी निवड केली जाऊ शकते अशी माहिती राजकीय सूत्राकडून समजते. तसेच मुंबईतील सह पोलीस आयुक्त पदावर असलेल्या गुन्हे शाखा, कायदा व सुव्यवस्था, प्रशासन, वाहतूक, आर्थिक गुन्हे शाखा यांच्या बदल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra Police)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community