तुमचे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे की नाही कुठे चेक कराल? ही आहे सोपी पद्धत…

आधार कार्ड (Aadhaar Card) पॅन कार्डला ( Pan Card) लिंक असणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेजकडून आधारला पॅन लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र सीबीडीटीद्वारे जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार आता तुम्ही आधार-पॅन लिंक केले नसेल तर तुम्हाला दंड आकारला जाणार आहे. एखाद्या व्यक्तीने जर ३० जून २०२२च्या पूर्वी आधार-पॅन लिंक केले तर तुम्हाला ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे आणि तुम्ही ३० जून २०२२ नंतर आधारला पॅन लिंक केले तर तुम्हाला १००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे तुमचे आधार – पॅन लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्या, तुमचे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे की नाही ते कसे चेक कराल? याविषयी आपण जाणून घेऊया…

( हेही वाचा : पॅन कार्ड आधारला लिंक नाही? १ जुलैपासून भरावा लागेल इतका दंड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!)

आधार कार्ड – पॅन कार्ड लिंकिंग ऑनलाईन चेक करण्याची सोपी पद्धत

  • आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही या वेबसाइटला भेट द्या.

https://www.pan.utiitsl.com/panaadhaarlink/forms/pan.html/panaadhaar

  • या वेबसाइटवर गेल्यावर तिथे तुमचा पॅन कार्ड नंबर, तुमची जन्मतारीख आणि कॅप्चा टाका.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे आधार-पॅन लिंकिंगचे स्टेटस लगेच कळेल.
  • आधार पॅन कार्डशी लिंक करण्याची सोपी पद्धत

आधार- पॅन कार्ड असे लिंक करा 

  • घरबसल्या आधार-पॅन लिंक करण्यासाठी इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइटला म्हणजे भेट द्या – https://www.incometax.gov.in/iec/foportal
  • Link Aadhaar या सेस्शनवर क्लिक करा
  • याठिकाणी पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि इतर महत्वाची माहिती भरा
  • माहिती भरल्यावर Link Aadhaar वर क्लिक करून सबमिट बटणवर क्लिक करा

SMS द्वारे घरबसल्या लिंक करा

ऑनलाईनप्रमाणेच तुम्ही घरबसल्या SMS द्वारे सुद्धा पॅन-आधार लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला UIDAIPAN ( १२ अंकी आधार क्रमांक) स्पेस ( १० अंकी पॅन क्रमांक ) असा SMS 567678 किंवा 56161 या नंबरवर पाठवा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here