मध्य रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी (२२ डिसेंबर) मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येईल. तर, पश्चिम रेल्वेवर शनिवारी (२१ डिसेंबर) रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Megablock)
पश्चिम रेल्वे (Western Railway)
कुठे : वसई रोड – भाईदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत विरार/वसई रोड – बोरिवली/भाईदर स्थानकादरम्यान सर्व धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन दिशेच्या काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक असेल. (Megablock)
मध्य रेल्वे (Central Railway)
कुठे : ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : रविवारी सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – कल्याणदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर धावणाऱ्या लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकावर थांबतील. (Megablock)
ट्रान्स हार्बर मार्गावर (Trans Harbor)
कुठे : ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत ट्रान्सहार्बर मार्गावरील पनवेल-ठाणे, ठाणे-वाशी/नेरुळ/पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. (Megablock)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community