मुंबईत गोवर कोणत्या वयोगटात होतोय, जाणून घ्या…

143

मुंबईत वाढत्या गोवरच्या रुग्णांची संख्या पाहता प्रामुख्याने चारवर्षापर्यंतच्या मुलांमध्ये आढळून येत आहे. दहा वर्षांपुढील मुलांमध्येही गोवरचे रुग्ण आढळले असून, काही रुग्ण पंधरा वर्षांच्याही पुढे आहेत. मात्र दहा वर्षांपुढील गोवरबाधित मुलांचे प्रमाण फारच कमी असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. तर ५० टक्क्यांहून कमी मुलांनी पहिल्या लसीकरणाचा डोस केवळ घेतला आहे. ३४६ रुग्णांपैकी १३३ गोवरबाधितांनी पहिल्या लसीकरणाचा डोस घेतला आहे. बाकी रुग्णांच्या लसीकरणाच्या माहितीत प्रचंड तफावत आहे.

अतिरिक्त लसीकरणाची मात्राही दिली जात

गोवरच्या वाढत्या केसेसमुळे गोवंडी, कुर्ला तसेच इतर वॉर्डातही लसीकरण न झालेली मुले सापडली आहेत. त्यापैकी गोवंडीतील ब-यात गोवरबाधित मुलांचे लसीकरण झालेलेच नाही, मुंबईतील सर्वच गोवरबाधित लहान बाळांचे मृत्यू गोवंडीत दिसून आले आहेत. कुर्ल्यातही गोवंडीपाठोपाठ गोवरचे रुग्ण आढळले असले तरीही ब-यापैकी रुग्णांचे लसीकरण झालेले असल्याने या विभागांत लसीकरण झालेल्या बाळांची संख्या अधिक आहे. परिणामी, गोवरची लागण होऊनही लसीकरण झालेल्या बाळापैकी एकाचाही मृत्यू ओढावला नाही. मात्र गोवंडी आणि कुर्ला या दोन्ही विभागात ९ महिन्यांखालील बाळांनाही गोवर झाल्याचे आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी घरोघरी केलेल्या सर्व्हेक्षणात आढळले. गोवंडीत बहुतांश लसीकरण केंद्रात गोवर-रुबेलाची अतिरिक्त लसीकरणाची मात्राही दिली जात आहे. तर कुर्ल्यात दोन आरोग्य केंद्रात अतिरिक्त लसीकरण सुरु करण्यात आले. पालिका आरोग्य खात्याच्या नोंदीत दोनशेहून अधिक मुलांच्या लसीकरणाच्या माहितीत लसीकरण दिलेच नसल्याचे उघडकीस आले आहे. या बाधित रुग्णांनाही लसीकरणाची मात्रा दिली जाईल, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाने दिले.

(हेही वाचा सिद्धिविनायक मंदिरात भ्रष्टाचार; मनसेचा उद्धव गटावर गंभीर आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.