दहावीचा निकाल लागल्यावर सर्वत्र ११ वी प्रवेशाची चर्चा सुरू होते. दहावीनंतर पुढे काय, उच्च शिक्षणासाठी कोणत्या शाखेची ( Stream) निवड करावी तसेच कमी मार्क्स मिळाले आता काय? असे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होतात. यावेळी बहुतांश पालक आपल्या पाल्याची IQ टेस्ट करतात किंवा करिअर समुपदेशन करतात, जास्त टक्के मिळाले म्हणजे मुलाने विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा अशी इच्छा असते परंतु अलिकडे परिस्थितीत बदल होऊन विद्यार्थी आपल्या इच्छेनुसार करिअरच्या संधी निवडतात. NSS (National Sample Survey) नुसार देशातील प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्यांचा कल कोणत्या शैक्षणिक शाखांकडे आहे जाणून घेऊया…
( हेही वाचा : ‘बेस्ट’ AC डबल डेकर बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार; बसची वैशिष्ट्य, तिकीट किती असेल?)
राज्य | मानवी शिक्षण (Humanities) टक्केवारी | तांत्रिक शिक्षण ( Technical Courses) टक्केवारी |
हिमाचल प्रदेश | ४४.४ | २० |
पंजाब | ४७.५ | ३६.८ |
उत्तराखंड | ४३.४ | १९.१ |
हरियाणा | ३८.९ | २५.३ |
दिल्ली | ५०.४ | २३.३ |
उत्तर प्रदेश | ५६.५ | १५.३ |
राजस्थान | ६४.७ | १३.८ |
मध्य प्रदेश | ३३.८ | २१.५ |
गुजरात | २०.४ | २९ |
बिहार | ७०.५ | ४.१ |
आसाम | ६५.२ | ६ |
झारखंड | ७४ | ६.६ |
पश्चिम बंगाल | ६७ | १४.६ |
ओडिशा | ६१.३ | १३.५ |
छत्तीसगड | ३६.४ | १९ |
महाराष्ट्र | ३१.२ | २७.७ |
तेलंगणा | १.६ | ३९.९ |
कर्नाटक | २०.६ | ३५.६ |
आंध्र प्रदेश | ४.७ | ४२ |
तामिळनाडू | ७.३ | ४०.५ |
केरळ | १५.८ | ४३.१ |
या आकडेवारीतून हे स्पष्ट होते की उत्तर भारतातील विद्यार्थ्यांचा कल हा मानवी शिक्षणाकडे अधिक असून दक्षिण भारतातील विद्यार्थी तांत्रिक शिक्षण घेणं पसंत करतात. मानवी शिक्षणात कला शाखा, लॉ अभ्यास, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, भूगोल या विषयांचा समावेश होतो तर तांत्रिक शिक्षण पूर्ण करून, IIT, इंजिनीअर पदवी आपण मिळवू शकतो. मानवी शिक्षणाचे प्रमाण उत्तर भारतात अधिक असल्याने येथील विद्यार्थी जास्त सरकारी नोकऱ्यांना प्राधान्य देतात.
राज्य निहाय आकडेवारी
मुंबई युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियनच्या (BUCTU) ताज्या अहवालानुसार राज्यभरात कायदा आणि तंत्रज्ञान यासारख्या अभ्यासक्रमांनी, कोरोना काळात सुद्धा विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यात यश मिळविले. २०२०- २१ मध्ये केवळ १.६८ लाख विद्यार्थ्यांनी मानवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला, हे प्रमाण २०१९-२०२० मध्ये २.५१ लाख होते.
पुणे विद्यापीठात पारंपरिक मानल्या जाणाऱ्या कला, विज्ञान, वाणिज्य शाखांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाल्याचे चित्र आहे. या पारंपरिक अभ्यासक्रमापेक्षा व्यावसायिक म्हणदेच मॅनेटमेंट, कायदा(Law) अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या काही वर्षांत वाढली आहे. दोन वर्षात इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २१ हजारांनी वाढली आहे.
Join Our WhatsApp Community