संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनला २० जूनपर्यंत वेळ लागू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असला, तरीही आज शनिवार, (१५ जून) पासून पुढील ५ दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. (Rain Update)
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, शनिवारी दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उत्तर कोकणातही पावसाच्या सरी बरसतील. दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. (Rain Update)
(हेही वाचा – T20 World Cup 2024 : अमेरिका, कॅनडा सामना पावसात गेला वाहून, अमेरिका सुपर ८ मध्ये, पाकचं आव्हान संपुष्टात )
तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी जमिनीत ६ इंच ओल जाईपर्यंत पेरणीची घाई करू नये, असा सल्लादेखील देण्यात आला आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस?
आयएमडीच्या अंदाजानुसार, शनिवारी, (१५ जून) रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल तसेच पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी बरसतील. याशिवाय धुळे, नंदुरबार, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांनादेखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही पहा –