White House : अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये आहे भव्य स्वयंपाकघर; इथे कधीही थांबत नाही काम

187

हल्लीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचा दौरा पूर्ण झाला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांना अमेरिकेतील राष्ट्रपती आवास म्हणजेच व्हाईट हाऊस मधल्या पंचतारांकित स्वयंपाकघरातले शाकाहारी आणि रुचकर अन्नपदार्थ वाढले गेले होते. तुम्हाला माहिती आहे का की, हे स्वयंपाकघर किती मोठे आहे? तसेच या स्वयंपाकघरात कोणकोणते पदार्थ बनवले जातात? चला जाणून घेऊयात…

असं म्हटलं जातं की, अमेरिकेतले व्हाईट हाऊस इतके सुंदर आहे की, जगातल्या कोणत्याही देशातले राष्ट्रपतींचे निवासस्थान इतके सुंदर नाही. इथली सुरक्षा व्यवस्था जितकी मजबूत आहे तितकीच जय्यत मेजवानीसाठी तयारी व्हाईट हाऊसमधल्या स्वयंपाकघरात केली जाते. व्हाईट हाऊसमधल्या स्वयंपाकघरातले काम कधीच थांबत नाही. ते चोवीस तास सुरू असते.

पंचावन्न हजार चौरस फूट एवढ्या जागेमध्ये सहा मजली व्हाईट हाऊस वसलेले आहे. या इमारतीत राष्ट्रपतींचे कार्यालय, निवासस्थान आणि भलेमोठे स्वयंपाकघर आहे. या स्वयंपाक घरात दरदिवशी राष्ट्रपतींच्या कुटूंबियांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे रुचकर अन्नपदार्थ तयार केले जातात. तसेच व्हाईट हाऊसमध्ये मोठी मेजवानी असल्यास त्याचीही जंगी तयारी या स्वयंपाकघरात केली जाते. राष्ट्रपतींच्या ओव्हल ऑफिसमध्ये एक लाल बटन असते. हे बटन दाबून राष्ट्रपती स्वयंपाकघरातून आपल्या आवडीचे ताजे रुचकर अन्नपदार्थ किंवा पेये मागवू शकतात.

(हेही वाचा खाते वाटपाच्या आटापाट्यात क्रीडा विभागाच्या ‘त्या’ जीआरला खो!)

क्रिस्टेडा कोमरफोर्ड नावाची महिला गेल्या सोळा वर्षांपासून या भव्य स्वयंपाकघराच्या एक्सिक्युटिव्ह शेफ आहे. पहिल्यांदा 1985 साली असिस्टंट शेफ म्हणून कामाला रुजू झाली होती आणि आता गेल्या सोळा वर्षांपासून मुख्य स्वयंपाकी म्हणून कामाला आहे.

व्हाईट हाऊसच्या स्वयंपाक घरात बाहेरचे अन्नपदार्थ आणण्याची परवानगी अजिबात नाही. या स्वयंपाकघरात खूप सावधानता बाळगून अन्न तयार केले जाते. ही एक खुप मोठी जबाबदारी असते. या स्वयंपाकघरात कोणत्याही वेळेस जवळपास दीडशे लोकांचे जेवण तयार करण्याची पूर्ण तयारी केलेली असते. पण त्यापेक्षा अधिक मोठी मेजवानी तयार करायची असल्यास पूर्वसूचना द्यावी लागते तेव्हा तिथले कर्मचारी एक हजार लोकांचे जेवण सहज तयार करू शकतात. या स्वयंपाकघराचे काम चोवीस तास सुरू असते. तसेच व्हाईट हाऊसमधल्या साफसफाईचे कामही कधी बंद होत नसते. दर चार वर्षांनी नव्या राष्ट्रपतींच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन स्वयंपाकघरात खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळे बदल केले जातात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.