White Ration Card: पांढऱ्या रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! जरुर वाचा

426
White Ration Card: पांढऱ्या रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! जरुर वाचा
White Ration Card: पांढऱ्या रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! जरुर वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेआधी (White Ration Card) महाराष्ट्रात सर्वसामान्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं गिफ्ट दिलं आहे. मागील वर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा वाढवून ती दीड लाखांवरुन पाच लाख रुपये केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. आता १ जुलैपासून ही योजना सर्वांसाठी लागू होणार असून कोणत्याही शिधापत्रिका धारकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विम्याचा लाभ घेता येणार आहे. (White Ration Card)

पांढऱ्या रेशन कार्डधारकांनाही आरोग्य विम्याचा लाभ घेता येणार

यापूर्वी हा आरोग्य विमा, दीड लाख रुपयांचं विमा संरक्षण महाराष्ट्रातील केवळ पिवळ्या आणि केशरी या रेशन कार्ड धारकांसाठी उपलब्ध होतं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा होती. वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये असणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना उपलब्ध होती. मात्र आता १ जुलै २०२४ पासून महाराष्ट्रभरातील पांढऱ्या रेशन कार्डधारकांनाही (White Ration Card) या आरोग्य विम्याचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी पांढरे रेशन कार्ड आपल्या आधार कार्डसोबत जोडण्याचे आदेश देण्यात आले असून यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, उपनियंत्रक शिधावाटप, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड जोडणीच्या सूचना राज्यभरात देण्यात आल्या आहेत. (White Ration Card)

(हेही वाचा –BJP Core Committee Meeting : महायुतीत समन्वयाचा अभाव नको, केंद्रीय नेत्यांच्या सूचना)

महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन योजना एकत्रितपणे राबण्याचा निर्णय २०१९ मध्ये आरोग्य विभागाने घेतला होता. अता २०२३ मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली आहे. मागील वर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अर्थात MJPJAY ही योजना योजना जाहीर केली होती. आरोग्य विम्याची मर्यादा दीड लाखांवरुन पाच लाख करण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र त्याची अंमलबजावणी आता १ जुलैपासून होणार असून सर्व वर्गातील लोकांना, तसंच पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांसह पांढरे रेशन कार्डधारकदेखील आता या मोफत आरोग्य योजनेचा लाभ घेऊ शकतात. (White Ration Card)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.