जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडनॉम गुरुवारी यमन येथील विमानतळावर इस्त्रायलच्या एअरस्ट्राइकमध्ये थोडक्यात बचावले. या हल्ल्यात दोन जणांचा मृ्त्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. टेड्रोस त्यांच्या संयुक्त राष्ट्र (US) आणि डब्ल्यूएचओ सहकाऱ्यांसोबत फ्लाइटमध्ये बसणार होते तेवढ्यात हल्ला झाला. यावेळी विमानातील दोन क्रू मेंबर्स जखमी झाले.
(हेही वाचा New Year : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून काय होणार आहेत बदल? जाणून घ्या…)
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये, WHO प्रमुख गेब्रेयसस म्हणाले, “यूएन कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करण्याचे आणि येमेनमधील आरोग्य आणि मानवतावादी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याचे आमचे ध्येय आज संपत आहे. कैद्यांची तात्काळ सुटका व्हावी, यासाठी आम्ही सतत आवाहन करत राहू. आम्ही सनाहून आमच्या फ्लाइटला निघायच्या सुमारे दोन तास आधी, विमानतळावर हवाई गोळीबार झाला. आमच्या विमानातील क्रू मेंबर्सपैकी एक जखमी झाले आहेत. विमानतळावर किमान दोन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर, डिपार्चर लाउंज – आम्ही होतो तिथून काही मीटर अंतरावर – आणि धावपट्टी खराब झाली होती. आम्ही निघण्यापूर्वी विमानतळाचे नुकसान दुरुस्त होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. माझे UN आणि WHO सहकारी आणि मी सुरक्षित आहोत. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करण्याचे आवाहन केले आणि नागरिक आणि मानवतावादी कामगारांना कधीही लक्ष्य केले जाऊ नये यावर भर दिला.
Join Our WhatsApp Community