नवी मुंबईतील CIDCO च्या घरांना वाली कोण? अद्यापही ‘या’ भागातील घरे विक्रीच्या प्रतिक्षेत

104

मुंबई किंवा नवी मुंबई परिसरात आपल्या हक्काचे घर असावे असे प्रत्येक सामान्य माणसांचे स्वप्न असते. त्यासाठी ते जीवाचे रान करतात. पण गत काही वर्षांपासून सिडकोची घरे (CIDCO house rates) महाग असल्याची ओरड सर्वसामान्यांकडून सुरू असली तरी अद्याप ही सिडकोचे घर शिल्लक आहेत. यापूर्वी सिडको ने वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या होत्या. तरीही पूर्ण क्षमतेने घर विकली गेली नाहीये. (CIDCO)

आतापर्यंतच्या सिडकोच्या कैक योजनांना अर्जदारांनी चांगला प्रतिसादही दिला. पण, यावेळी मात्र याच सिडकोची सध्याची योजना मात्र गटांगळ्या खाताना दिसत आहे. सिडकोनं काही महिन्यांपूर्वी ‘माझे पसंतीचे घर’ (CIDCO Maaze Pasantiche Ghar) ही योजना सुरू केली होती. साधारण 26502 घरांसाठीची ही योजना सामान्यांच्या भेटीला आली. पण, त्यासाठी आतापर्यंत अवघे 22000 अर्जच दाखल करण्यात आले असून त्याच अर्जदारांनी (CIDCO Applicants) नोंदणी शुल्क भरलं आहे. जवळपास पाच वेळा मुदतवाढ देऊनही सिडकोच्या या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसून, मोठ्या संख्येनं घरांना वालीच नसल्याचं आता स्पष्ट होत असल्यामुळं ही योजना अपयशी ठरत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.

(हेही वाचा – चीनला काँग्रेसने आपल्या डोक्यावर बसवले; MP Nishikant Dubey यांचा घणाघात)

सिडकोनं नुकतंच अधिकृत संकेतस्थळावर जारी केलेल्या मसुदा यादीनुसार योजनेसाठी सहभागी झालेल्या अर्जदारांची आकडेवारी समोर आली आहे. वाशी, तळोजा, पनवेल, खारघर, उलवे, खांदेश्वर या भागांमध्ये ही घरं (Home) विक्रीसाठी उपलब्ध करून देत या घरांच्या किमती 25 लाख ते 97 लाखांदरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे.

घरांच्या किमती खालीलप्रमाणे… 

(आर्थिक दुर्बल घटक – कार्पेट 322)

खारकोपर  2A – 38.6 लाख
खारकोपर  2B – 38.6 लाख
कळंबोली बस डेपो  – 41.9 लाख
बामणडोंगरी -31. 9 लाख
तळोजा सेक्टर 28 – 25.1 लाख
तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख
खारघर बस डेपो, सेक्टर 14 – 48. 3 लाख 

(अल्प उत्पन्न गट एलआयजी -LIG)

मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख
खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख खारकोपर ईस्ट – 40.3 लाख
वाशी ट्रक टर्मिनल – 74.1 लाख
खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख
पनवेल बस टर्मिनस – 45.1 लाख
खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख
तळोजा सेक्टर 37 – 34.2 लाख /46.4 लाख

(हेही वाचा – भारतातील government veterinary hospital ची संख्या किती ? जाणून घ्या एका क्लिकवर )

रेल्वे स्थानक, रुग्णालयं, भाजी मंडई, महामार्ग नजीक असतानाही या योजनेतील बरीच घरं अद्यापही अर्जदारांच्याच प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.