परमबीर सिंग यांना पोलीस आयुक्त कुणी केलं? भाजपाच्या Chitra Wagh यांचा मविआला सवाल

218
शाळांमध्ये सीसीटीव्ही आणि लैंगिक अत्याचाराविरोधात कठोर कारवाईची मागणी; आमदार Chitra Wagh यांचा सभागृहात प्रस्ताव

भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून मविआचा (MVA) खरपूस समाचार घेतला. त्यामध्ये चित्रा वाघ यांनी सचिन वाझे (Sachin Waze) आणि परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या पोलीस सेवेसंदर्भात सवाल उपस्थित केला. तसेच बात निकली है तो बहुत दूर तक जाएगी, आगे आगे देखिए होता है क्या! असा इशारा देखील चित्रा वाघ यांनी दिला ‘एक्स’च्या माध्यमातून दिला आहे.  (Chitra Wagh) 

चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर टीका केली, असून अनिल देशमुखांविरोधात अनेक पुरावे आहेत असं चित्रा वाघ म्हणतं आहेत. अनिल देशमुखांना बोलता ही येत नाही आणि गप्प ही राहता येत नाही असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. परमवीर सिंग यांनीच सगळ बाहेर काढलं असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

(हेही वाचा – नागपूर ड्रग्जच्या विळख्यात; डीआयआरकडून MD Drugsचा कारखाना उदध्वस्त; ७८ कोटींचा अमली पदार्थांचा साठा जप्त)

यापार्श्वभुमीवर चित्रा वाघ म्हणाल्या, सचिन वाझेंना (Sachin Waze) सेवेत घेणारे तुम्हीच, परमबीर सिंग यांना पोलिस आयुक्त करणारे पण तुम्हीच केवळ तुमची वसूलीची राजकीय कटकारस्थानाची लफडी त्यांनी बाहेर काढली म्हणून आता तुम्ही अंग का झटकत आहात. पोपट तर तुमचा झाला आहे. ज्याला बोलता ही यात नाही आणि गप्पसुद्धा राहता येत नाही.

(हेही वाचा – Hindenburg Research: “नोटीसला उत्तर देण्याऐवजी आमच्यावरच आरोप लावताय” हिंडेनबर्गवर SEBI प्रमुखांचा पलटवार)

यासर्वांचे व्हिडीओ पुरावे आहेतच, तुमच्या प्रविण चव्हाणने हा कट ऑन कॅमेरा सांगितला आहे. त्याचीही सीबीआय चौकशी सुरुच आहे. उद्धव ठाकरेंनी कितीही दबाव आणला तरी वाझेला सेवेत परत घेण्याच्या फाईलवर सही करण्यास त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून आमचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्ट नकार दिला होता याच ही तुम्हाला स्मरण होत असेलचं. असे विधान चित्रा वाघ यांनी केले.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.