युरोपात कोरोनाचे थैमान सुरूच! काय आहे स्थिती?

कोरोनाने युरोपात थैमान घातले आहे. युरोपमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येने जागतिक आरोग्य संघटना आणि तज्ज्ञांना आश्चर्यचकित केले आहे. या वेगाने जर कोरोना रुग्णसंख्या वाढत राहिली, तर युरोपमध्ये कोरोनामुळे 7 लाख मृत्यू होऊ शकतात, अशी जागतिक आरोग्य संघटनेने चेतावणी दिली आहे.

बुस्टर डोस देण्यास प्राधान्य द्यावे

युरोपातील दोन डझनहून अधिक देशांमध्ये येत्या काही महिन्यांत कोरोना व्हायरसमुळे आणखी सात लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 20 लाखांहून अधिक होण्याची शक्यता आहे,असे  डब्ल्यूएचओच्या युरोप कार्यालयाने म्हटले आहे. युरोपमध्ये डब्ल्यूएचओचे कार्यालय डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे आहे. या संस्थेने कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक आणि आरोग्य कर्मचार्‍यांसह सर्वात असुरक्षित लोकसंख्येला लसीचा बूस्टर डोस देण्यास प्राधान्य द्यावे, असे सांगितले आहे.

युरोपमध्ये कोविडची स्थिती अत्यंत गंभीर 

डब्ल्यूएचओने लोकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, लोकांना लस घेण्याचे आणि स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून विषाणूचा प्रसार रोखता येईल.आज संपूर्ण युरोप आणि मध्य आशियामध्ये कोविड-19 ची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. आपल्यासमोर हिवाळा ऋतूचे आव्हान आहे, परंतु आपण धीराने घ्यायला हवे . सरकार,आरोग्य अधिकारी आणि सामान्य नागरिक संघटितपणे याला तोंड देऊ शकतो. असे डब्ल्यूएचओ युरोपचे प्रादेशिक संचालक डॉ. क्लुजे यांनी एका निवेदनात म्हटले आहे .

 ( हेही वाचा : बापरे! क्रिप्टो करन्सीचा व्यवहार १ हजार ६३५ अब्ज डॉलर)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here