ऐन दिवाळीची धामधूम सर्वत्र सुरु असताना नवी मुंबईत मात्र शोककळा पसरली. या ठिकाणी एकाच कुटुंबातील सर्वच्या सर्व तीन सदस्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली. या तिघांच्या आत्महत्येचे नक्की कारण काय होते, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
सर्वजण ज्येष्ठ नागरिक
वाशी येथे ही धक्कादायक घटना घडली. त्यामध्ये मोहिनी कामवानी (८५) ह्या त्यांचा मुलगा दिलीप कामवानी (६७) आणि मुलगी कांता कामवानी (६१) यांच्यासोबत राहत होत्या. या तिघांनी विष प्राशन करुन सामूहिक आत्महत्या केली. विष प्राशन केल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला होता. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र, तिघांचाही मृत्यू झाला. या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, दिवाळीपूर्वी घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
(हेही वाचा : आता वर्षा गायकवाडांवर भूखंड घोटाळ्याचा आरोप! कुणी केली तक्रार?)
आर्थिक नैराश्येतून आत्महत्या
प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबातील तिघांनी आर्थिक नैराश्येतून हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. तिघांनीही दोन दिवसांपूर्वी उंदीर मारण्याचे औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. औषध प्राशन केल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला.
कर्नाटकातही ५ जणांची सामूहिक आत्महत्या
आठवड्याभरापूर्वी कर्नाटकातून अशीच सामूहिक आत्महत्येचा प्रकार घडला. ब्लॅक फंगसमुळे पत्नीच्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या एका सेवा निवृत्त सैनिकाने आणि त्याच्या पाच मुलांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना हुक्केरी तालुक्यातील एका गावातील आहे. गोपाळ हदिमानी (४६) आणि त्यांची चार मुले सौम्या (१९), श्वेता (१६), साक्षी (११) आणि सृजन हदिमानी (८) यांनी विष घेऊन आत्महत्या केली.
Join Our WhatsApp Community