“साब कब तक बंद रखना पड़ेगा धंदा, असे फेरीवाले जेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्याला विचारतात तेव्हा अधिकारी ‘थोड़ा सब्र करो, अधिवेशन खत्म होने दो, फिर देखते है, तब तक तुम लोग धंदा मत लगाना, नही कारवाई करना पड़ेगा, पुलिस केस भी हो सकती है’ असे सांगतात. रस्त्यावर फेरीचा व्यवसाय करणाऱ्या हॉकर्स आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या एका अधिकाऱ्यामधील हा सवांद आहे. फेरीवाल्यावर (Hawker) मुंबईत कारवाई सुरू करण्यात आल्यानंतर फेरीवाले पोलीस आणि मनपा अधिकारी यांना विनवणी करताना दिसत आहेत. ही कारवाई कधी संपणार असा प्रश्न फेरीवाले अधिकारी यांना विचारत आहे आणि अधिकारी वेळ मारून घेण्यासाठी त्यांना थातुरमातुर उत्तरे देताना दिसत आहेत.
मुंबई महानगर पालिकेने मागील काही दिवसांपासून मुंबईत रस्त्यावर फेरीचा (Hawker) व्यवसाय करणाऱ्यावर धडक कारवाई सुरू केली आहे. मागील काही दिवसात मुंबईतील रस्ते फेरीवाला मुक्त झाले आहे, मुंबईकरांनी मनपाच्या या कारवाईचे मनापासून स्वागत केले आहे. परंतु या कारवाईमुळे पोटापाण्यासाठी रस्त्यावर फेरीचा व्यवसाय करणाऱ्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. मुंबईतील रस्ते जरी फेरीच्या व्यवसायापासून मुक्त झालेले असले तरी फेरीचा व्यवसाय करणारा हॉकर्स त्या ठिकाणी फिरताना दिसतात. आज ना उद्या धंदा सुरू होईल, आपली जागा कोणी बळकावून घेईल या भीतीने हे हॉकर्स दररोज या ठिकाणी येतात व आपल्या जागेचे राखण करताना दिसतात.
(हेही वाचा काँग्रेस परजीवी पक्ष; PM Narendra Modi यांचा घणाघात)
हिंदुस्थान पोस्टच्या प्रतिनिधीने फेरीवाल्याशी (Hawker) केलेल्या संवाद
- प्रतिनिधी – ‘ भाई कब शुरू होगा धंदा,
- फेरीवाला- साब लोग तो बोल रहे है, जल्दी शुरू होगा,
- प्रतिनिधी – लेकीन धंदा क्यू नही लगाने दे रहे?
- फेरीवाला- वो हायकोर्ट का ऑर्डर है, म्युनिसिपालटी के साब लोग बता रहे है, असेंम्बली भी चालू है ना इसलीए कारवाई शुरु है.
- प्रतिनिधी – तुमको किसने बताया?
- फेरीवाला – अरे गाडीपर एक साब से, बात किया मैने, साब कब तक बंद रखना पड़ेगा धंदा, तब साब ने बताया की, थोड़ा सब्र करो, अधिवेशन शुरू है, वो खत्म होने दो, फिर देखते है, तब तक तुम लोग धंदा मत लगाना, नही कारवाई करना पड़ेगा, पुलिस केस भी हो सकती है, ऐसा बोल रहे है साब.
Join Our WhatsApp Community