ओमायक्रॉनच्या विषाणूमुळे राज्यावर वेळेअगोदरच आलेली तिसरी लाट ओसरली असली, तरीही यामुळे मृत्यू पावणा-या रुग्णांची संख्या अद्यापही शून्यावर आलेली नाही. कोरोनावर मात करण्यासाठी मृत्यूचा आकडा शून्यावर असणे गरजेचे आहे, असे मत आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे. परंतु लसीकरणापासून लांब पळणा-यांना वाचवणे कठीण झाल्याची कबुली आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
(हेही वाचाः मुंबई ते बेलापूर करा पाण्यातून प्रवास!)
लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन
गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. दर दिवसाला मृत्यूची संख्या किमान १२ ते ४० पर्यंत आढळून येत आहे. गुरुवारीही कोरोनामुळे ४० रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळे लवकरात लवकर कोरोनावरील प्रतिबंधासाठी प्रत्येकाने लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
आता केवळ २३ हजार ८१६ रुग्ण
राज्यात गुरुवारच्या माहितीनुसार, २३ हजार ८१६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले. तर २ हजार ७१७ नवे रुग्ण तपासणीतून समोर आले. गेल्या २४ तासांत डिस्चार्ज रुग्णांची संख्या ६ हजार ३८३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.
(हेही वाचाः शिवाजी पार्कमध्ये कॉंक्रिटचा रस्ता? काय आहे त्यामागील कारण?)
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- ९७.८२ टक्के
- राज्यातील कोरोनामुळे रुग्णांमध्ये आढळणारा मृत्यूदर- १.८२ टक्के
- राज्यातील तपासणीतून आढळणारा कोरोनाचे प्रमाण- १०.२२ टक्के