राज्यात तसेच नागपुरात महिला तसेच अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात अल्पवयीन मुलींना प्रेमात फसवून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. याशिवाय पालकांनी त्या मुली क्षुल्लक कारणांमुळे रागावून घर सोडून पळून जात असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानपरिषदेत दिली.
नागपूर जिल्ह्यात आठ महिन्यांत एकूण ३,८३८ जण बेपत्ता
याबाबत विधानपरिषदेचे सदस्य प्रवीण दटके, चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. वेळेअभावी हा प्रश्न चर्चेला येऊ शकला नाही. मात्र, यावर फडणवीस यांनी लेखी उत्तर सादर केले. या माहितीनुसार, एकट्या नागपूर जिल्ह्यात आठ महिन्यांत एकूण ३,८३८ जण बेपत्ता झाले. यात २०११ महिला व २२५ मुली आहेत. ३,८३८मधील ३,२३९ जण सापडले. घरगुती वादाखेरीज मुलींना प्रेमसंबंधांतून आमिष दाखविले जात आहे. यामुळेही पळून जाणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बेपत्ता मुलींना शोधण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविली जात आहे. तसेच मानवी तस्करी रोखण्यासाठीसुद्धा विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत, अशीही लेखी माहिती यावेळी फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली.
(हेही वाचा Dawood Ibrahim : हसीनाच्या मुलाने सांगितली दाऊद आणि त्याच्या भावांची पिलावळ)
Join Our WhatsApp Community