भारतीय संस्कृतीत गाईला खूप महत्व प्राप्त झाले आहे. गाईला आपण गोमाता म्हणतो. भारतीय वंशाच्या गाईच्या दूधापासून तयार झालेले पदार्थ पौष्टिक असतात आणि आरोग्यासाठी देखील चांगले असतात असं आपण म्हणतो. मात्र मंगोलियामध्ये गाईच्या दुधाऐवजी घोडीचं दूध पिण्याची पद्धत आहे. बकरीचं दूर, उंटाचं दूध आणि गाढवीणीचं दूध पितात हे तर आपल्याला माहिती आहे. मात्र घोडीचं दूध पिण्यामागचं कारण तरी काय असावं?
भारतात म्हशीचं दूध मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. खरं पाहता मंगोलियासह मध्य आशियातील अनेक ठिकाणी घोडीचं दूध पिण्याची पद्धत आहे. इथे घोडीचं पालन केलं जातं ते दोन कारणासाठी एक शर्यत आणि दुसरं म्हणते दुग्ध निर्मिती. तिथल्या लोकांचा असा समज आहे की घोडीचं दूध प्यायल्याने ऊर्जा मिळते. मंगोलियाने लोक पीके किंवा कुरणासाठी जमिनीचा वापर करण्याऐवजी प्राण्यांच्या खाद्यासाठी करतात.
(हेही वाचा कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण)
जपानच्या टोकियोमधील मीजी युनिव्हर्सिटीची जलवायू वैज्ञानिक मोरीनागा यांचं म्हणणं आहे की, मंगोलियन लोक भटके असतात आणि त्याम्ना जमीन व हनामानाची उत्तम जाण असते.’ लक्षात घ्या जगभरातील सुमारे ७०% किंवा त्याहून अधिक दुग्धजन्य पदार्थ गाईपासून तयार होतात. मात्र गाई पचन प्रक्रियेद्वारे पुष्कळ ग्रीन हाऊस वायू उत्सर्जित करतात. खरं पाहता मंगोलियन लोक घोड्यांचं पालन करतात, याचं कारण हेच की त्यांचा पर्यावरणावर कमी प्रभाव पडतो आणि त्यांचं पालन पोषण करण्याच्या देश पद्धतीमुळे खर्चही कमी होतो. म्हणूनच तिथले लोक घोडीचं दूध पितात.
Join Our WhatsApp Community